जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: मराठी अभिनेत्रीचा साउथ इंडियन तडका; प्रियाने बनवला चटपटीत डोसा

VIDEO: मराठी अभिनेत्रीचा साउथ इंडियन तडका; प्रियाने बनवला चटपटीत डोसा

VIDEO: मराठी अभिनेत्रीचा साउथ इंडियन तडका; प्रियाने बनवला चटपटीत डोसा

प्रिया मराठे सध्या सोनी मराठीवरील ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या ऐतिहासिक मालिकेत रायबागन ही महत्वाची भूमिका साकारत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 जून- ‘स्वराज्य जननी जिजामाता’ (Swarajya Janani Jijamata)  मालिकेमुळे अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) चांगलीच चर्चेत असते. कधी तिच्या घोडसवारीचे तर कधी तलवार बाजीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. मात्र एका उत्तम अभिनेत्रीसोबतचं प्रिया एक उत्तम गृहिणीसुद्धा आहे. तिचा नुकताच व्हायरल झालेला व्हिडीओ हेचं सिद्ध करत आहे. प्रियाने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये ती काहीतरी तोंडाला पाणी सुटेल असा पदार्थ बनवताना दिसत आहे. पाहूया काय आहे हा नेमका व्हिडीओ…

जाहिरात

अभिनेत्री प्रिया मराठे नेहमीचं आपल्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकताच प्रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती एका उत्तम गृहिणीच्या भूमिकेत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया साउथ इंडियन डोसा करत असल्याचं दिसत आहे. हे पाहून सर्वांच्याचं तोंडाला पाणी सुटलं आहे. चाहते कमेंट्स करून प्रियाचं कौतुक करत आहेत. तर काही चाहते प्रियाने बनवलेल्या डोश्याचं कौतुक करत आहेत. यावरूनचं प्रिया एक उत्तम गृहिणी असल्याचं देखील दिसून येत आहे. (हे वाचा: समरच्या अहंकारापुढे लागेल का मनू-अनिच्या प्रेमाचा टिकाव; मालिकेत नवा ट्वीस्ट   ) प्रिया सध्या सोनी मराठीवरील ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या ऐतिहासिक मालिकेत रायबागन ही महत्वाची भूमिका साकारत आहे. या मालिकेसाठी प्रियाने खुपचं मेहनत घेतली आहे. मालिकेच्या निमित्ताने प्रिया अनेकवेळा घोडसवारी आणि तलवारबाजी करताना दिसून येते. त्यामुळे प्रियाचं चाहत्यांकडून खुपचं कौतुक होतं असतं. (हे वाचा: स्वराज्यरक्षक संभाजी’मधील खाशाबा हरपला, अवघ्या 29व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   ) प्रसिद्ध हिंदी मालिका ‘पवित्र रिश्ता’ मधून प्रिया घराघरात पोहोचली होती. या मालिकेत प्रियाने महत्वाची भूमिका साकारली होती. मालिकेत प्रिया अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडेच्या बहिणींच्या भूमिकेत होती. ‘वर्षा’ असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात