मुंबई, 6 मे- महाराष्ट्र (Maharashtra) नंतर आत्ता गोव्यात (Goa) सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतं आहे. त्यामुळे गोवा सरकारनेसुद्धा लॉकडाऊनचा(Goa Lockdown) निर्णय घेतला आहे. आणि म्हणूनचं अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टींवर बंदी आली आहे. त्यामुळेच गोव्यातील शुटींगवर सुद्धा बंदी घालण्यात येत आहे. अशातच मराठी सिंगिंग शो ‘सूर नवा ध्यास नवा’(Sur Nava Dhyas Nava) च्या सेटवर जात फातोर्डाचे माजी आमदार विजयसिंह देसाई(Vijai Sardesai) यांनी विरोध दर्शविला आहे.
WHO GAINS WHEN FATORDA LOSES? https://t.co/yYXxEXP3Ga Ravindra Bhavan permission for Film Shootings with people not following social distancing & other CovidSOPs needs to be probed! How District Adminstration & Police, enforcing restriction guidelines, ignored these violations?
— Vijai Sardesai (@VijaiSardesai) May 5, 2021
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला होता. म्हणूनच राज्यातील सर्व मालिकांच्या शुटींगवर सुद्धा बंदी आणली होती. त्यामुळे सर्व कलाकार शुटींग साठी परराज्यात जातं होते. आणि मुख्यत्वे शुटिंगसाठी गोव्याचा पर्याय अवलंबण्यात आला होता. मात्र आत्ताचं चित्र पाहता गोव्यात सुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी शुटींगसाठी विरोध दर्शविला आहे. (हे वाचा: बॉलीवूडला आणखी एक मोठा धक्का, ज्येष्ठ अभिनेत्री श्रीपदा यांचं कोरोनाने निधन… ) मुंबई लॉकडाऊन नंतर गोव्यातील मडगाव येथे ‘सूर नवा ध्यास नवा’ या शोचं शुटींग सुरु होतं. मात्र गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे माजी आमदार विजय सरदेसाई यांनी कडाडून विरोध केला आहे. विजय यांनी अचानक या शोच्या सेटवर प्रवेश करत, तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. तेथे बऱ्याच लोकांच्याकडे मास्क नसल्याचे आढळून आले. त्याचबरोबर सेटवर सोशल डीस्टन्सिंग नसल्याचंही त्यांनी म्हटल आहे. सेटवरची दृश्ये त्यांनी कॅमेरातसुद्धा घेतली आहेत. आणि हा व्हिडीओ त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सुद्धा शेयर केला आहे. (हे वाचा: कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरला सोनू सूद; 22 जणांचा असा वाचवला जीव ) यावेळी सेटवर सर्व स्पर्धकांसोबतचं परीक्षक आणि गायक अवधूत गुप्ते सुद्धा उपस्थित होते. अवधूत गुप्ते यांनी सुद्धा विजय सरदेसाई यांना समजवण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्वजण कोरोना चाचणी करून आल्याचंदेखील सांगितलं. मात्र तरीसुद्धा विजय सरदेसाई काहीच ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. शेवटी या शोचं शुटींग थांबवण्यात आलं आहे. तसेच गोव्यातील स्थानिक नागरिकांनी देखील शुटींगवर बंदी आणून कडक निर्बंध लावण्याची मागणी केली आही.