मुंबई, 5 मे: कोरोनाने (
Coronavirus in India) अक्षरशः थैमान घातलं आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार प्रत्येकाला कोरोनाचा फटका बसत आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे मृतांचा. आज दिवसभरात मनोरंजन सृष्टीतून अनेक वाईट बातम्या समोर आल्या आहेत. नुकताच ज्येष्ठ अभिनेत्री (
Senior Actress) श्रीप्रदा (
Shripddha) यांच्या निधनाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मनोरंजन सृष्टीला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री श्रीप्रदा यांनी अनेक हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांत काम केलं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आणि कोरोनामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज त्यांचा कोरोनाशी लढा अपयशी ठरला. ‘सिने आणि टीव्ही आरटीस्टेट’ चे सहाय्यक जनरल सेक्रेटरी अमित बेहल यांनी या बातमीचं पुष्टीकरण केलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना, बहल यांनी म्हटलं आहे, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक अमुल्य जीवांचा बळी घेतला आहे. याआधी माध्यमांनी याबद्दल सांगितलचं आहे. मी सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्येष्ठ अभिनेत्री श्रीप्रदा यांच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे. त्या मनोरंजनसृष्टीतल एक ज्येष्ठ सदस्या होत्या.
(हे वाचा:
मनोरंजनसृष्टीला पुन्हा मोठा धक्का; आता अभिनेत्याच्या भावाचा कोरोनाने घेतला बळी)
त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी दक्षिण आणि हिंदी चित्रपटांत उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिचं प्रार्थना. त्याचबरोबर मी हीसुद्धा प्रार्थना करू इच्छितो, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अजून कोणते अमुल्य जीव जातं कामा नये. खासकरून आमच्या फिल्डमधील तरी'.
(हे वाचा:
Rashmi Rocket चा एडिटर अजय शर्माचा कोरोनाने मृत्यू; मागितला होता ऑक्सिजन बेड)
अभिनेता रवी किशन याने श्रीप्रदा यांचासोबत भोजपुरी चित्रपट ‘हम हो गयी नी तोहार’ या चित्रपटात काम केलं आहे. रवी यांनी श्रीप्रदाच्या आठवणींना उजाळा देत म्हटलं आहे. त्या माझ्या सह-कलाकार होत्या, त्या खुपचं उत्तम स्वभावाच्या, नम्र आणि सभ्य अभिनेत्री होत्या. देव त्यांच्या कुटुंबाला हे सर्व सहन करण्याची ताकत देवो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.