जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरला सोनू सूद; 22 जणांचा असा वाचवला जीव

कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरला सोनू सूद; 22 जणांचा असा वाचवला जीव

कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरला सोनू सूद; 22 जणांचा असा वाचवला जीव

सोनू सूदने कोरोना काळात अनेक लोकांना मदत केली (Sonu Sood Help In Corona Pandemic) आहे. त्यामुळेच प्रत्येक जण सोनूकडे मदतीचा हात मागत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बंगळुरू, 05 मे : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट (Covid 19 second wave) आलेली आहे. याचे भयानक परिणाम समोर येत आहेत. कोरोनाने गेल्यावर्षी पेक्षाही जास्त थैमान यावर्षी घातलं आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कोरोनामुळे देशाची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. प्रत्येक ठिकाणी लोकांना मदतीची गरज पडत आहे. सध्या ऑक्सिजन, बेड, औषधं यांचा तुटवडा असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे लोक पुरते घाबरून गेले आहेत. अशातच काही कलाकार सामाजिक बांधिलकी जपत मदतीसाठी धावून येत आहेत. अभिनेता सोनू सूदचं (Sonu Sood) नाव यात सर्वात वर आहे, असंच म्हणावं लागेल. सोनू सूदने या काळात अनेक लोकांना मदत केली (Sonu Sood Help In Corona Pandemic) आहे. त्यामुळेच प्रत्येकजण सोनूकडे मदतीचा हात मागत आहे. नुकतंच सोनू सूद आणि त्याच्या टीमने कोरोना 22 रुग्णांचा जीव वाचला आहे. त्यामुळे सर्वत्र सोनू सूदच्या कार्याचं कौतुक होतं आहे. हे वाचा -  रामायण फेम अरविंद त्रिवेदी, गायक लकी अली यांच्या निधनाच्या अफवांवर स्पष्टीकरण बंगळुरूमधील येलाहंका शहरातील पोलीस अधिकारी एमआर सत्यनारायण यांनी सोनू सूदच्या संस्थेतील एका कर्मचाऱ्याला फोन करून मदत करण्याची मागणी केली होती. या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं होतं. एआरके रुग्णालयातील परिस्थिती खूपच गंभीर आहे. याठिकाणी ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. आधीच ऑक्सिजन अभावी 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि मदतीची खूप गरज आहे. त्यानंतर लगेच सोनू सूदची टीम आपल्या कर्तव्यात गुंतली. मध्यरात्री या लोकांनी ऑक्सिजन सिलेंडरचा शोध सुरू केला होता. टीमसोबतचं सोनू सूदसुद्धा रात्रभर ऑक्सिजन सिलेंडर शोधण्यासाठी धडपड करत होता आणि अखेर त्यांना यश आलं. अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर सोनूच्या टीमने 15 ऑक्सिजन सिलेंडर मिळवले आणि  बंगळुरूमधील रुग्णालयात पाठवून दिले. हे वाचा -  कोरोनाने हिरावले वडील, सलमान खानने घेतली 18 वर्षीय मुलाची जबाबदारी सोनू सूद आणि त्याच्या टीमच्या या कार्याने तब्बल 22 रुग्णांचा जीव वाचला आहे. त्यामुळे सर्वत्र सोनू सूदच्या कार्याचं कौतुक होतं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात