जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Savani Ravindra : ऐकीकडे राष्ट्रीय पुरस्कार दुसरीकडे 2 महिन्याची उपाशी लेक; सावनी रवींद्र सांगितला डिप्रेशनचा तो अनुभव

Savani Ravindra : ऐकीकडे राष्ट्रीय पुरस्कार दुसरीकडे 2 महिन्याची उपाशी लेक; सावनी रवींद्र सांगितला डिप्रेशनचा तो अनुभव

सावनी रवींद्र

सावनी रवींद्र

सावनीला बार्डो या सिनेमातील रान पेटलं या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी 67व्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना सावनी डिप्रेशनमध्ये होती हे सावनीनं पहिल्यांदा सांगितलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 जुलै : मराठी सिनेसृष्टीला लाभलेली गोड गळ्याची गायिका सावनी रवींद्र सध्या बाईपण भारी देवा सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात तिनं गायलेली मंगळागौरीची गाणी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियावर या गाण्यांना चांगली पसंती मिळतेय. गायिका सावनी रवींद्रचं यासाठी खूप कौतुक देखील केलं जातं. पहिल्यांदाच एका सिनेमात सगळी गाणी एकाच गायिकेनं गायली आहेत. आज यशाच्या शिखरावर असलेल्या सावनीला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. दरम्यान या काळात तिनं डिप्रेशनचा देखील सामना केला होता. नुकत्याच एका मुलाखतीत डिप्रेशनमध्ये असताना राष्ट्रीय पुरस्कार कसा स्वीकारला याबद्दल पहिल्यांदा सावनीनं भाष्य केलं आहे. सावनीला ‘बार्डो’ या सिनेमातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी 67व्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारता सावनी द्विधा मनस्थितीमध्ये होती. पुरस्काराच्या वितरण सोहळ्याच्या वेळेस सावनीची नुकतीच डिलिव्हरी झाली होती. तिची लेक शार्वी अवघ्या 2 महिन्यांची होती. या काळात ती पोस्टपार्टम म्हणजेच डिलिव्हरीच्या नंतर येणाऱ्या डिप्रेशनचा सामना केला होता. याबद्दल एबीपी माझाशी बोलताना सावनीनं खुलासा केला. हेही वाचा -  Prasad-Amruta: साखरपुडा गुपचूप-गुपचूप, प्रेम मात्र खुल्लम खुल्ला; अमृता-प्रसादचं रोमँटिक फोटोशूट व्हायरल सावनी म्हणाली,  “आई झाल्यानंतर पहिले तीन महिने खूप अवघड असतात. तुमच्यात ती ताकद असते म्हणून देव तुम्हाला ती चॅलेंजेस देतो. आईपण ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. आईपण खूप स्पेशल गोष्ट आहे. त्याचा जितका आनंद आहे. तितकेच चॅलेंजेस आहेत”.

News18लोकमत
News18लोकमत

सावनी पुढे म्हणाली, “राष्ट्रीय पुरस्कार घ्यायला गेले तेव्हा माझी मुलगी 2 महिन्यांची होती. ती पूर्णपणे फिडींगवर होती. राष्ट्रीय पुरस्कार घेण्याचा आनंद होता. पण टेंशन होतं की पाच तास मी ऑडिटोरियममध्ये असणार आहे आणि 5 तास मुलगी उपाशी राहाणार आहे. तिला माझ्यापासून दूर ठेवून, उपाशी ठेवून मी पुरस्कार घ्यायला कुठे जाऊ, असं मला वाटत होतं. मी तिची सगळी सोय करून ठेवली होती. आई-बाबांना तिला फॉर्म्युला द्या असं सांगितलं होतं”. हेही वाचा -  छोट्या परीच्या ‘व्हॉट झुमका’ ची करण जोहरनेही घेतली दखल, डायरेक्ट व्हिडिओ केला पोस्ट पाच तास बाळ उपाशी राहिलं “तेव्हा मलाही कळत नव्हतं  मला आता आनंद व्हायला पाहिजे होता की मला राष्ट्रीय पुरस्कार मिळतोय तो स्वीकारायला मी गेले. माझं आयुष्यभराचं स्वप्न आहे. पण त्या डिप्रेशनमुळे मला त्याचा आनंद घेता येत नव्हता. माझ्या शरिरात हार्मोनल इम्बॅलन्स होत होता त्यामुळे काही कळत नव्हतं. मी 5 तास तिच्याशिवाय कशी राहू या चिंतेत होते. तेव्हा मला कळलं की आईपण असतंच पण आपलं बाळ आपल्याला ताकद देत असतं की आई तू काम करत रहा. त्या दिवशी मुलगी 5 तास उपाशी राहिली. आई बाबांनी फॉर्म्युला देण्याचा प्रयत्न केला पण तिने काहीही खाल्लं नाही”, असं सावनीनं सांगितलं.

जाहिरात

दोन महत्त्वाच्या गोष्टी एकाच वेळी घडत होत्या “आई-बाबांनी आमचा एक फोटो क्लिक केला होता. ज्यात मी टीव्हीवर राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारतेय आणि आई बाबा तिला टीव्हीमध्ये दाखवत होते, की बघ तुझी आई पुरस्कार घेतेय. मी पुरस्कार घेतला आणि तिथल्या काही लोकांनी मला पुढच्या मुलाखतीसाठी बाजूला नेलं. तेव्हा मी त्यांना म्हटलं की प्लिज मला हॉटेलला जाऊ देत. तेव्हा आयुष्यातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी एकाच वेळी घडत होत्या. एकीकडे माझं 2 महिन्यांचं बाळ आणि दुसरीकडे नॅशनल टेलिव्हिजनवर माझी मुलाखत होणार होती.  तेव्हा नवऱ्याने मला धीर दिला. मी कशीबशी ती मुलाखत दिली. या सगळ्यात 5 तासांहून अधिक वेळ झाला होता. पण त्या मुलीने तोंडातून एक आवाजही काढला नाही. मी हॉटेलवर गेले. मुलीला जवळ घेतलं. तिला दूध पाजलं.  या सगळ्यात माझ्या बाळाने मला खूप ताकद दिली”, असं शेवटी सावनी म्हणाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात