मुंबई, 24 जुलै- सध्या सगळीकडे चर्चा आहे ती करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाची. या सिनेमातील ‘व्हॉट झुमका’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय होत आहे. गाण्याचं प्रमोशनही धडाक्यात सुरु आहे. ‘झुमका गिरा रे बरेली के बजार मे’ या जुन्या आयकॉनिक गाण्यातं हे रिक्रिएटेड व्हर्जन आहे. आलिया भट आणि रणवीर सिंगवर गाणं चित्रित करण्यात आलंय. या गाण्यावर अनेक नेटकरी रील व्हिडिओ पोस्ट करत आहेत. मराठीतील बालकलाकार सर्वांची लाडकी छोटी परी म्हणजे मायरा वायकुळनेही याच गाण्यावर रील केलं आहे. विशेष म्हणजे मायराच्या या रीलची करण जोहरला देखील भुरळ पडली आहे.करण जोहरने तिचा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे या लोकप्रिय कलाकारांच्या जोडीला आणखी एक नाव चर्चेत होतं ते म्हणजे मायरा वायकुळ. . मायराला या मालिकेमुळे अल्पावधीत प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं.मायराची या मालिकेमधील भूमिका लक्षात राहणारी ठरली. मायराचे सोशल मीडियावरही अनेक फॉलोवर्स आहेत. तिचे विडिओ आणि फोटो नेहमीच वायरल होत असतात.मराठी बालकलाकारांमध्ये मायराचं नाव अग्रगणी घेतलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं साडी नेसली… ‘स्वानंदीचा साखरपुडा लूक पाहून नेटकरी भारावले मायरा वायकुळ सोशल मीडिया स्टार आहे, हे सर्वांनाच माहित आहे. नेहमीच ती ट्रेंडिंग गाण्यावर रील करत असते. तिचा सोशल मीडियावर एक मोठा चाहता वर्ग आहे. हिंदी असो की मराठी गाणी, व्हायरल होत असलेले कोणत्याही गाण्यावर मायरा न चुकता रील्स करताना दिसते. तिची आई सोशल मीडियावर तिचे रील्स शेअर करत असते.
नुकतंच मायराने ‘व्हॉट झुमका’ या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स रील केले. या रीलमध्ये मायराने लाल टॉप, काळी सलवार आणि ओढणी अशी कपडे घातली आहेत. मायरा या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे खूप क्यूट दिसत आहे. तिचं हे रील सोशल मीडियावर मात्र प्रचंड व्हायरल होत आहे. तिचा क्यूटनेट पाहून चाहते कमेंट करत तिच्यावर प्रेमाच वर्षाव करत आहेत.
मायराचा हा व्हिडिओ करण जोहरनेही त्याच्या स्टोरीवर रिपोस्ट केला आहे. तसंच करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शननेही त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिचे रील पोस्ट केले आहे. त्यामुळे चिमुकल्या मायराची दखल बॉलिवूडनेही घेतली आहे. मायरा सध्या ‘कलर्स’ वाहिनीवरील ‘नीरजा- एक नई पहचान’ या मालिकेत दिसत आहे.