VIDEO- ‘सुपर 30’ मधल्या हृतिकला पाहून तुम्ही व्हाल दंग, असा हृतिक तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल

हृतिक या सिनेमात बिहारमधील प्रसिद्ध शिक्षक आनंद कुमार यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हृतिकनेही या सिनेमासाठी कसून मेहनत घेतल्याचं या सिनेमात दिसतं.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 02:22 PM IST

VIDEO- ‘सुपर 30’ मधल्या हृतिकला पाहून तुम्ही व्हाल दंग, असा हृतिक तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल

मुंबई, 04 जून- हृतिक रोशनच्या सुपर ३० सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सुमारे वर्षभरानंतर हृतिकचा सिनेमा येत असल्यामुळे त्याचे चाहते फार उत्सुक आहेत. या सिनेमात हृतिकचा एक वेगळा अंदाज लोकांना पाहायला मिळणार आहे.

हृतिक या सिनेमात बिहारमधील प्रसिद्ध शिक्षक आनंद कुमार यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हृतिकनेही या सिनेमासाठी कसून मेहनत घेतल्याचं या सिनेमात दिसतं. ट्रेलरची लक्षवेधी गोष्ट म्हणजे हृतिक बोलत असलेली भाषा. हृतिकने बिहारी भाषेचा लहेजा खूप चांगल्याप्रकारे आत्मसात केला आहे.

VIDEO- ‘सुपर ३०’ च्या क्लासमध्ये दिसला हृतिक, म्हणाला उठा, शिका, लढा...

या सिनेमात आनंद कुमार यांची गोष्ट सांगण्यात आली आहे. सुरुवातीला आनंद (हहृतिक) यांना मोठ्या क्लासमध्ये शिकवण्याची संधी मिळते. ते शिकवायला सुरुवातही करतात. मात्र सधन मुलांना शिकवताना त्यांच्या लक्षात येतं की, जी मुलं गरीब आहेत त्यांच्या शिक्षणाचं काय? शेवटी आनंद गरीब वर्गातील मुलांना मोफत शिकवणी देण्याचं निश्चित करतात. त्यांच्या या निर्णयानंतर नावाजलेल्या कोचिंग क्लासेसच्या मालकांना धक्का बसतो. यानंतर कथानक वेगळं वळण घेतं.

फक्त आहिलचा मामाच नाही तर या मुलांचा आजोबाही झालाय सलमान खान

Loading...

या ट्रेलरमध्ये सिनेमात नक्की काय दाखवण्यात येणार आहे याची उत्तमरित्या झलक दाखवली आहे. सिनेमात हृतिकसोबत पंकज त्रिपाठीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हृतिक मुलांचा क्लास कसा घेणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 02:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...