• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO: मनू-अनिची गंमत जंमत; दोघांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीची होतेय चर्चा

VIDEO: मनू-अनिची गंमत जंमत; दोघांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीची होतेय चर्चा

नुकताच मनू म्हणजेच तन्वी मुंडलेने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 2 जुलै- ‘पाहिले नं मी तुला’(Pahile Na Mi Tula) मालिकेत मनू (Manu) आणि अनिकेतची(Aniket) ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी गोड तितकीच ऑफस्क्रीनसुद्धा. मनू आणि अनिकेत म्हणजेच अभिनेत्री तन्वी मुंडले आणि अभिनेता आशय कुलकर्णी सेटवर खुपचं मजामस्ती करत असतात. शुटींगमधून जो मोकळा वेळ मिळतो त्यावेळी हे दोघेही धम्माल करताना दिसून येतात. सतत या दोघांचे व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे.पाहूया काय आहे हा व्हिडीओ.
  झी मराठीवर प्रसारित होणारी ‘पाहिले नं मी तुला’ जी मालिका अल्पावधीतचं खूप लोकप्रिय ठरली आहे. मालिकेतील मनू आणि अनिकेतचं निस्वार्थी प्रेम आणि त्यात समरच्या खुरापती चाहत्यांना चांगल्याच पसंत पडतात. मालिकेत मनू आणि अनिकेत एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हे झालं मालिकेतील, आत्ता आपण जाणून घेऊया ऑफस्क्रीन या दोघांचं नात नेमकं कसं आहे. (हे वाचा:'अनुपमा' फेम रुपालीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट करत दिली माहिती  ) मनू आणि अनिकेतची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा खुपचं सुंदर आहे. हे सह कलाकार एकमेकांसोबत नेहमीचं मजामस्ती करताना दिसून येतात. मनू आणि अनिकेत सतत आपल्या इन्स्टाग्रामवर काही नं काही मजेशीर किंवा डान्स व्हिडीओ शेयर करत असतात. आणि त्या व्हिडीओना मोठी पसंतीसुद्धा मिळत असते. खुपचं कमी वेळेत या जोडीने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. (हे वाचा: 'My First Reel' म्हणत मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीने शेयर केला VIDEO) नुकताच मनू म्हणजेच तन्वी मुंडलेने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये मनू आणि अनिकेत म्हणजेच तन्वी आणि आशय गंमत जंमत करत असल्याचं दिसून येत आहे. या दोघांचं टाइमिंग खुपचं परफेक्ट आहे. त्यामुळे दोघेही करत असलेल्या स्टेप्स खुपचं सुंदर वाटत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ पाहायला देखील मज्जा येत आहे. ऑफस्क्रीन या दोघांचीही मज्जा सुरु असली, त्री ऑनस्क्रीन हे दोघेही समरच्या खुरपतींचा सामना करत आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: