जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कशा असतात ह्या बायका...तेजश्री प्रधान नव्या भूमिकेत; पाहा VIDEO

कशा असतात ह्या बायका...तेजश्री प्रधान नव्या भूमिकेत; पाहा VIDEO

कशा असतात ह्या बायका...तेजश्री प्रधान नव्या भूमिकेत; पाहा VIDEO

‘कशा असतात ह्या बायका’ असे शीर्षक असलेला हा लघुपट घर, कुटुंब आणि आपले करीअर यांचा योग्य तो समतोल सांभळणा-या सर्व महिलांना समर्पित आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई. 23 ऑक्टोबर : ‘अग्गंबाई सासूबाई.’ या मालिकेतील शुभ्राने प्रेक्षकांची मने जिंकली होती. शुभ्रा ही भूZमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने (tejashree pradhan) साकरली होती. आता ही शुभ्रा एका नव्या भूमिकेत (kasha astat hya bayka) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तेजश्रीसोबत अभिनेता अभिजीत खांडकेकर **(abhijeet khandakekar )**देखील दिसत आहे. ते दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले आहेत. तेजश्रीने हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, भावा बहिणीच्या नात्यातले, नाजूक पदर उलगडणारी, एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या पाठीशी समर्थपणे उभी राहणारी ही नव्या जमान्यातील भावा बहिणीची जोडी… आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीची सर्व पातळ्यांवर लढण्याची, आणि नाती जपण्याची सक्षमता दाखविणारी एक छोटीशी गोष्ट!

जाहिरात

दिवाळी अवघी काही दिवसांवर आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भावा-बहिणाच्या नात्याला अधोरेखीत करण्याबरोबरच घर, संसार आणि नोकरी अशी तिहेरी कसरत करणा-या महिलांवर आधारीत अशी ‘कशा असतात या बायका’ हा लघुपट प्रदर्शित झाला आहे. तेजश्री आणि अभिजीत या लघूपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत. कोटा फॅक्टरी फेम अभिनेता मयुर मोरे सुद्धा या भावस्पर्शी लघुपटाद्वारे मराठीत पदार्पण केले आहे. वाचा,  ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील अभ्याचं ते बिंग फुटलं ; समोर आला पडद्यामागील Video ‘कशा असतात या बायका’ हा लघुपट फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्रामवर बघायला मिळणार आहे. अदभूत क्रिएटीव्हज निर्मित हा लघुपटाचे दिग्दर्शन वैभव पंडित यांनी केले आहे. तर त्याचे लेखन मोनिका धारणकर यांचे आहे. ‘कशा असतात ह्या बायका’ असे शीर्षक असलेला हा लघुपट घर, कुटुंब आणि आपले करीअर यांचा योग्य तो समतोल सांभळणा-या सर्व महिलांना समर्पित आहे. वाचा,  Jeev Mazha Guntala : सुहासिनीच्या एका निर्णयामुळे अंतराच्या संकटात वाढ या लघुपटामधून तरल, हलकाफुलका आणि हळव्या पद्धतीने एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे ही शॉर्ट्फिल्म नवीन पिढीच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते. हा जरी भाऊबीज विशेष लघुपट असला तरी कथा केवळ बहिणीबद्दल नाही. ती आपल्या समाजातील बहुतांश महिलांची भावना व्यक्त करते. तेजश्री, अभिजीत आणि मयूर यांनी त्यांची कामे चोख पार पडताना दिसत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात