मुंबई. 23 ऑक्टोबर : जीव माझा गुंतला **(Jeev Mazha Guntala )**ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिया मालिकेपैकी एक मालिका आहे. या मालिकेतील **(Jeev Mazha Guntala Latest Episode )**अंतरा आणि मल्हारची जोडी प्रेक्षकांच्या आवडती जोडी आहे. मालिकेत या दोघांचे लग्ना झाले असले तरी मल्हारने मात्र आजही अंतराला पत्नी म्हणून स्वीकरलेले नाही. अशातच आता अंतराने रिक्षा पुन्हा चालवायचा निर्णय घेताला आहे. मात्र तिचा हा निर्णय घरच्यांना खास करून सुवासिनीला मान्या नाही. यासाठी ती अंतराला सुनावताना दिसते आहे. सुहासिनी एक निर्णय घेणार आहे ज्यामुळे लवकरच अंतराची परीक्षा सुरु होणार असल्याचे दिसत आहे.त्यातच अंतराच्या हाताला काच लागते ज्यामुळे तिच्या हाताला जखम होते.. हे सगळं मल्हार देखील पाहत आहे मात्र मल्हारला आता तरी अंतराच्या प्रेमाचा पाझर फुटेल का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. नुकताच कर्लस मराठीच्या इन्स्टा पेजवर एक प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये सुवासिनी अंतराच्याबाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. अंतराला रिक्षा चालवण्यासाठी सकाळी नाष्टा केल्यानंतरच बाहेर पडावे लागेल तसेंच घरी देखील दिवे लागायच्या आत यावे लागेल ..असं सांगितलं आहे. सोबतच यात कोणताही बदल होणार नाही असं खडसावलं देखील आहे. त्यामुळे अंतराच्या पुढे आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुवासिनी हे सांगून जात असते तेवढ्यात ग्लासची काच अंतराच्या हाताला लागते आणि तिच्या हातातून रक्त येते हे सगळं मल्हाराच्या देखील निदर्शनास देखील येते. मात्र अंतराची ही अवस्था पाहून देखील मल्हारला अंतराविषयी मनात प्रेम निर्माण होणार का याची उत्सुकता तर लागली आहे. तर दुसरीकडे सुवासिनीच्या या परिक्षेत अंतरा पास होणार का आणि सुवासिनीचा विश्वास मिळवण्यात यशस्वी होणार का याची देखील चिंता प्रेक्षकांना सतावत आहे. वाचा : कृत्रिम पायामुळे अभिनेत्रीला सहन करावा लागला मनस्ताप शेवटी CISF चा माफीनामा सुवासिनी आणि अंतरा मध्ये गैरसमज दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मल्हारने देखील अंतराला अजून पत्नी म्हणून स्वीकारलेले नाही. अंतरा कुठेतरी सगळं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते आहे. आणि त्या सगळ्यामध्ये आता हे नवं संकट तिच्यासमोर उभे ठाकणार आहे.अंतराच्या या निर्णयाचा मल्हार आणि अंतराच्या नात्यावर काय परिणाम होईल, तिचा हा निर्णय कुठलं नवं संकट तिच्या पुढे घेऊन येईल का मल्हार तिच्या प्रेमात पडेल हे सगळं या मालिकाच्या येणाऱ्या भागातच समजेल.