पुणे, 17 नोव्हेंबर- मराठमोळा अभिनेता अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) विरोधात आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात पत्नी स्नेहा विश्वासरावने (Sneha Chavan) घरगुती हिंसाचार आणि मारहाणी प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पुण्ययातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये (Alankar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अनिकेतची पत्नी अभिनेत्री स्नेहाने सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण करु नये यासाठी अनिकेत सतत प्रयत्नशील असायचा, नातेवाईकांसमोर तिला सतत अपमानास्पद वागणूक द्यायचा. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असे स्नेहाने तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणात पती अनिकेत विश्वासराव याला सासरे चंद्रकांत आणि सासू अदिती यांनी साथ देण्याचे काम केले असल्याचा आरोप देखील तिनं केला आहे. वाचा : मुंबईत भामट्यांनी बॉलिवूड अभिनेत्रीची पर्स हिसकावली; झटापटीत Actress जखमी अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण यांनी 2018 साली लग्न केले होते. लग्नानंतर काही काळातच अनिकेतने पत्नी स्नेहाला मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर पाहुण्यांसमोर देखील तो तिला कमी लेखत असे. आपली पत्नी आपल्या पेक्षा वरचढ ठरायला नको आपल्या पेक्षा लोकप्रिय ठरायला नको या हेतूने तो तिला कायम कमी लेखत असे, लोकांसमोर तो तिला अपमानास्पद वागणूक देत असे. मारहाण देखील केली होती. मारहाण करताना त्याने तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता असे स्नेहाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
अनिकेत विश्वासराव हा मुंबईतच वास्तव्यास आहे. मुंबईतील दहिसर येथी विश्वासराव रेसिडेंसीमध्ये हे कुटुंब राहत होते. ह्या सर्व घटना ह्याच ठिकाणी घडल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान आपली पत्नी चित्रपट सृष्टीत पुढे जाऊ नये या हेतूने अनिकेत स्नेहवर दबाव आणून तिची छळवणूक करत असे. डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 202 यादरम्यान माझी छळवणूक झाली असल्याचे स्नेहाने अनिकेत वर आरोप लावले आहेत. स्नेहा या काळात पुण्यात असलेल्या तिच्या माहेरी दाखल झाली आहे आणि तिने अनिकेत विरोधात तक्रार नोंदवली आहे. वाचा : Liger: बॉक्सिंग गॉड फादर Mike Tyson यांनी घेतला भारतीय पदार्थांचा आस्वाद…. अनिकेतने नो एन्ट्री पुढे धोका आहे, बोल बेबी बोल, पोश्टर गर्ल, पोश्टर बॉईज या आणि अशा अनेक चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

)







