मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Liger: बॉक्सिंग गॉड फादर Mike Tyson यांनी घेतला भारतीय पदार्थांचा आस्वाद; या आहेत फेव्हरेट डिशेज

Liger: बॉक्सिंग गॉड फादर Mike Tyson यांनी घेतला भारतीय पदार्थांचा आस्वाद; या आहेत फेव्हरेट डिशेज

टायसन 'Liger' या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. यामध्ये त्याचा क्रूर अवतार पाहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत त्यांनी 'लाइगर'च्या टीमसोबत भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,  17 नोव्हेंबर-   साऊथ सुपरस्टार  (South Superstar)  विजय देवरकोंडा  (Vijay Devarkonda)  सध्या यूएसएमध्ये डॅशिंग दिग्दर्शक जगन्नाथ पुरी यांच्यासोबत 'लायगर'  (Liger)  या मल्टीस्टारर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान बॉक्सिंग गॉड म्हणवल्या जाणाऱ्या माईक टायसनसोबत   (Mike Tyson)  हा अभिनेता समोर आला. टायसन या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. यामध्ये त्याचा क्रूर अवतार पाहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत त्यांनी 'लायगर'च्या टीमसोबत भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला. यासोबतच त्याने अभिनेत्यासोबत पोजही दिल्या आहेत.

विजय देवरकोंडा, पुरी जगन्नाध आणि 'लायगर' चित्रपटाची संपूर्ण टीम खूप उत्सुक आहे. माईक टायसन देखील या सर्वाचा खूप आनंद घेत आहे. टायसनला भारतीय पदार्थ आवडतात आणि त्यांनी त्याच्या आवडत्या भारतीय जेवणाची ऑर्डर दिली होती. माईकसाठी खास जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी त्याची पत्नी किकी आणि संपूर्ण टीम उपस्थित होती. माइक टायसनने लंचमध्ये गार्लिक नान, बटर चिकन, तंदूरी चिकन, फिश टिक्का मसाला आणि मटन बिर्याणीची ऑर्डर दिली होती.

याशिवाय टायसनने आलू गोबी, पालक पनीर, समोसे आणि कबाबही ऑर्डर केले होते. टायसनची भारतीय जेवणाची क्रेझ पाहून सगळेच थक्क झाले.चित्रपटाच्या टीमच्यावतीने त्यांना प्रेमाने व आपुलकीने जेवू घालण्यात आलं. या आदरातिथ्याने टायसन खूप खूश झाले आहेत. चित्रपटाच्या सेटवरचे वातावरण अतिशय आनंदी होते. एक्स बॉक्सर्स संघाचा पूर्ण पाठिंबा देतात. माइक टायसन या चित्रपटात विजय देवरकोंडा, पुरी जगन्नाध, अनन्या पांडे आणि चार्मी कौर यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

बॉलीवूड चित्रपट निर्माता करण जोहरसह पुरी जगन्नाध यांनी 'लायगर'ची निर्मिती केली आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. हा पॅन इंडियाचा मोठा प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे. धर्मा प्रॉडक्शन मोठ्या प्रमाणावर त्याची निर्मिती करत आहे.चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर विजय आणि माइक टायसन आणि अनन्या पांडेव्यतिरिक्त रम्या कृष्णन आणि रोनित रॉय हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट हिंदी, इंग्रजी, तेलुगु, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. निर्माते 2022 मध्ये 'Liger' रिलीज करण्याची योजना आखत आहेत.

First published:

Tags: Ananya panday, Bollywood News, South indian actor