• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • मुंबईत भामट्यांनी बॉलिवूड अभिनेत्रीची पर्स हिसकावली; झटापटीत Actress जखमी

मुंबईत भामट्यांनी बॉलिवूड अभिनेत्रीची पर्स हिसकावली; झटापटीत Actress जखमी

मुंबईत (Mumbai) एका ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्रीची (Bollywood actress) चोरट्यांनी पर्स हिसकावल्याची (Handbag snatched) घटना समोर आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 नोव्हेंबर: मुंबईत (Mumbai) एका ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्रीची (Bollywood actress) चोरट्यांनी पर्स हिसकावल्याची (Handbag snatched) घटना समोर आली आहे. संबंधित अभिनेत्री औषध आणण्यासाठी मेडिकलमध्ये जात असताना, हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी दुचाकीवरून आलेल्या भामट्यांना पकडण्याच्या प्रयत्नात संबंधित अभिनेत्री जखमी (Actress injured) झाली आहे. या प्रकरणी अभिनेत्रीनं पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केली नसल्याची माहिती वर्सोवा पोलिसांनी दिली आहे. सलमा आगा (Salama Agha) असं संबंधित अभिनेत्रीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमा या शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास रिक्षाने  मेडिकलमध्ये औषध आणण्यासाठी जात होत्या. दरम्यान त्याठिकाणी आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या हातातील पर्स हिसकावून पळ काढला आहे. याप्रकरणी पीडित अभिनेत्रीनं कर्तव्यावर असलेल्या पोलिसांकडे दरोड्याची तक्रार देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी पर्स हरवल्याची तक्रार केली तरच आरोपींना शोधू असं सांगितलं, असा आरोपी सलमा आगा यांनी केला आहे. हेही वाचा-दागिने लुटण्यासाठी तरुणानं लढवली अनोखी शक्कल; कारनामा वाचून लावाल डोक्याला हात मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास सलमा आगा यांच्या कारचालकाने गाडी बंगल्यात सोडून घरी निघून गेला होता. पण रात्री तीनच्या सुमारास आगा यांना औषध आणण्यासाठी मेडिकलमध्ये जायचं होतं. यावेळी कारचालक घरी नसल्याने त्या रिक्षाने मेडिकलमध्ये गेल्या. याचवेळी वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी त्यांची पर्स हिसकावली आहे. या प्रकरणी कोणतीही तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती वर्सोवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिराज इनामदार यांनी दिली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: