मुंबई 17 मे: बहुगुणी अभिनेत्री मुक्ता बर्वेचा (Mukta Barve Birthday) आज 43 वा वाढदिवस आहे. मुक्ताचा जन्म हा पुण्यात झाला असून लहानपणापासून तिला अभिनयाची आवड होती. त्यात तिने रीतसर पदवीचं शिक्षण घेत मुक्ता मराठी अभिनय क्षेत्रात आली आणि सगळ्यांच्या मनात तिने तिची जागा निर्माण केली. पण वयाची चाळीशी ओलांडून सुद्धा मुक्ता अजूनही अविवाहित का आहे? मुक्ताला लग्नाबद्दल (Mukta Barve marriage) या आधीही बरेचदा विचारणा झाली पण तिने त्यावर ठोस स्पष्टीकरण दिलेलं नाही. “मी अविवाहित आहे. मी आत्ता जितकी सुखी आणि आनंदी आहे त्यापेक्षा माझा आनंद आणि सुख वाढणार असेल तरच मी लग्न करेन”, असं तिने स्प्ष्ट केलं होतं. असं असूनही मुक्ता बर्वेचा मराठीतील एका नामांकित अभिनेता-दिग्दर्शकावर क्रश होता (Mukta Barve crush). आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून मुक्ताचा जुना मित्र सतीश राजवाडे आहे. ‘नंबर 1 यारी विथ स्वप्नील’ या शो मधल्या मुलाखतीत मुक्ताने याबद्दल खुलासा केला होता.
वाचा - धक्कादायक! ‘फॅट फ्री’ सर्जरीनंतर 21 वर्षीय Tv अभिनेत्रीचा मृत्यूमुक्ताला या मुलाखतीत सतीशबद्दलचं तिचं मत आणि एकंदर मैत्री कशी झाली यावर प्रश्न विचारला होता तेव्हा तिच्या जुन्या मित्राबद्दल हसत हसत मुक्ता म्हणाली, “सतीशच्या एकूण व्यक्तिमत्त्वाकडे बघून मीच नाही आमच्या चमूमधल्या अनेकजणी हुरळून गेल्या होत्या. त्याच्या वावरामुळे आम्ही काही जणी तालीम, नाटक याबद्दल उगीचच जास्त रस घ्यायला लागलो. तेव्हा आम्ही नुकत्याच तारुण्यात आलेल्या असल्याने सतीशबद्दल आम्हाला एक वेगळीच आत्मीयता होती. पण मग नंतर जेव्हा समजलं की सतीशचं लग्न झालंय तेव्हा माझा खूप हिरमोड झाला आणि उफाळून आलेला सगळा रस निघून गेला. पण हा गमतीचा भाग सोडता सतीश आणि माझी मैत्री खूप जुनी आणि घट्ट आहे.” मुक्ता, सतीश आणि स्वप्नील फार घट्ट मित्र असल्याचं या मुलाखतीत जाणवतं. एकमेकांसोबत त्यांची असलेली khas मैत्री त्यांच्या खोडकर वागणुकीतून जाणवते. मुक्ताने सतीश राजवाडे सोबत एक डाव धोबीपछाड, मुंबई पुणे मुंबई, मुंबई पुणे मुंबई2, मुंबई पुणे मुंबई 3 असे अनेक हिट चित्रपट केले आहेत. रुद्रम या मालिकेत मुक्ताच्या पतीच्या भूमिकेत सतीशने काम केलं होतं. मुक्ताने सर्वात जास्त काम सतीशसोबत केलं आहे. मुक्ताने या आधीही सतीशच्या दिग्दर्शनाबद्दल अनेक मुलाखतीत भरभरून कौतुक केलं आहे. सतीश हा एक मित्र म्हणून किती चांगला आहे यावर सुद्धा बोलताना कधी तिने हात आखडता घेतला नाही.