मुंबई, 17 मे- मनोरंजन सृष्टीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कन्नड टीव्ही अभिनेत्री (Kannada Tv Actress) चेतना राज (Chethana Raj) हिचं प्लास्टिक सर्जरीनंतर निधन झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ही अभिनेत्री अवघ्या 21 वर्षांची होती. बंगळुरूमधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये अभिनेत्रीने प्लास्टिक सर्जरी करुन घेतली होती. त्यांनतर काही तासांतच अभिनेत्रीच निधन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्री चेतना राज काल म्हणजेच 16 मे रोजी बंगळुरू येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. मीडिया रिपोर्टनुसार, याठिकाणी अभिनेत्रीने स्वतःवर ‘फॅट फ्री’ सर्जरी करून घेतली. काही तास गेल्यानंतर संध्याकाळी मात्र अभिनेत्रीला अस्वस्थ वाटू लागलं. तिला वेगळाच त्रास जाणवू लागला. त्यांनतर अभिनेत्रींच्या फुफ्फुसांत पाणी साठत असल्याचं दिसून आलं. तिच्या तब्बेतीत तिला बदल जाणवू लागला होता. मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार, चेतनाने आपल्या पालकांना किंवा कुटुंबियांना या शस्त्रक्रियेबाबत कोणतीही माहिती दिलेली नव्हती.तथापि ती आपल्या मित्रांसोबत हॉस्पिटलमध्ये गेल्याच सांगण्यात येत आहे. नुकतंच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, असं सांगितलं जात आहे की, अभिनेत्री चेतना राजचे पालक याबाबतीत हॉस्पिटलमधील डॉक्टरांनां जबाबदार धरत आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या मुलीचा जीव गेल्याचा दावा ते करत आहेत. सध्या अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







