मुंबई, 1 नोव्हेंबर : सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्यावर कोण कधी आपलं होऊन जाईल काही सांगता येत नाही. काही नाती तात्पुरती होतात तर काही नाती आयुष्यभर टिकून राहतात. अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, सचिन पिळगावकर या जोड्या तर अजरामर आहेत. तर टेलिव्हिजन सुरू झाल्यानंतर अशाच काही जोड्या मराठी सिनेसृष्टी त तयार झाल्या आणि ज्या मागचे अनेक वर्ष एकमेकांबरोबर काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. वादळवाट ते आता येऊ घातलेला सनी असा तब्बल 18 वर्षांचा एकत्र प्रवास करणारी जोडी म्हणजे अभिनेता दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर आणि अभिनेत्री निर्माती क्षिती जोग. दोघांनी नव्या सिनेमानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा देत फोटो शेअर केला आहे. घरापासून लांब गेलेल्या ‘सनी’ची गोष्ट सांगणारा सनी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यात अभिनेता ललित प्रभाकर सनीच्या मुख्य भूमिकेत आहे. तर हेमंत ढोमे दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या सिनेमात ललित प्रभाकरसह क्षिती जोग यांच्यासह चिन्मय मांडलेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे. या निमित्तानं क्षिती आणि चिन्मय पुन्हा एकदा एकत्र कार करणार आहे. सिनेमात दोघे पहिल्यांदाचं एकत्र काम करणार आहे. मात्र याआधी दोघांनी टेलिव्हिजनचा पडदा गाजवला आहे. हेही वाचा - Hemant Dhome: ‘आता बरोबर एक वर्षाने…’; हेमंत ढोमेनं शेअर केली खास POST
अभिनेत्री क्षिती जोगनं सिनेमातील चिन्मय आणि तिचा फोटो शेअर करत 18 वर्षातील दोघांनी एकत्र केलेल्या प्रोजेक्टची नावं सांगितली आहेत. झी मराठीची पहिला गाजलेली मालिका म्हणजे ‘वादळवाट’. या मालिकेत क्षिती चिन्मय यांनी एकत्र काम केलं होतं. त्यानंतर चिन्मय मांडलेकर लिखीत आणि अभिनीत ‘तू तिथे मी’ या प्रसिद्ध मालिकेतही दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी सध्या सोनी मराठीवर सुरू असलेल्या ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत दोघे एकत्र आले. त्यानंतर आता थेट ‘सनी’ या सिनेमात दोघेही मोठ्या पडद्यावर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. सनी हा सिनेमा येत्या 18 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील क्षिती आणि चिन्मय यांच्या भूमिकेविषयी सांगायचं झालं तर क्षित यात जीगरवाली बाई ही भूमिका साकारणार आहे. तिचं खरं नाव वैदेही असं असून कॅफे मालक असलेली वैदेही सनीबरोबर कधी कठोर तर कधी त्याची काळजीही घेताना दिसणार आहे. सनी आणि वैदेहीमध्ये कामासोबतच भावनिक नातं निर्माण झाल्याचंही पाहायला मिळणार आहे.
तर अभिनेता चिन्मय मांडलेकर विश्वजित मोहिते पाटील या कार्यसम्राट आमदाराची व्यक्तिरेखा साकारणार आहे. विश्वजित अतिशय करारी, शिस्तप्रिय आहे.