मुंबई 17 ऑगस्ट : मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आणि पत्नी सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांचा आज जन्म दिवस. आजवर अनेक चित्रपटांतून या कपलने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 17 ऑगस्ट 1957 ला सचिन यांचा एका मराठी कुटुंबात मुंबईत जन्म झाला होता. बालपणापासून अभिनय क्षेत्रात असणारे सचिन हे वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासूनच बालकलाकर म्हणून काम करत आहेत. एक बालकलाकार म्हणून सचिन यांनी तब्बल 65 चित्रपटांत काम केलं आहे. तर 50 हून अधिक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. बालवयातच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. मराठीसह अनेक बॉलिवूड चित्रपटांत त्यांनी काम केलं होतं. शोले सारख्या हीट चित्रपटातही ते होते. गंमत जंमत, अशी ही बनवा बनवी, नवरा माझा नवसाचा सारखे सुपरहीट चित्रपट त्यांनी दिले.
HBD Spl: एकाच दिवशी वाढदिवस असणाऱ्या ‘पिळगावकर कपल’विषयी घ्या जाणून; दत्तक मुलीने केले होते गंभीर आरोपसुप्रिया यांचा जन्म 17 ऑगस्ट 1967 साली झाला होता. दरम्यान सचिन आणि सुप्रिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुप्रिया या केवळ 16 वर्षांच्या होत्या. तर सचिन हे त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे होते. त्यामुळे हे लग्न फार काळ टिकेल असं अनेकांना वाटत नव्हतं. मात्र आता त्यांच्या विवाहाला 32 वर्षे उलटली आहेत. तर आजही त्यांचं एकमेकांवर नितांत प्रेम आहे. त्यांना श्रीया पिळगावकर (Shreeya Pilgaonkar) ही मुलगी देखील आहे. ती देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
दरम्यान सचिन आणि सुप्रिया यांनी एक मुलगी दत्तक देखील घेतली होती. पण त्यामुळे त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. दरम्यान सचिन आणि सुप्रिया यांनी कमी वायतच करिश्माला दत्तक घेतलं होतं. पण नंतर सचिन आणि सुप्रिया यांनी सांगितलं की, करिश्माचे वडील तिला जबरदस्ती घेऊन गेले. पण करिश्माने सांगितलं की, जेव्हा सचिन यांनी तिला दत्तक घेतलं तेव्हा ती तिचे वडील कुलदीप मक्खनी यांना ओळखत होती. तर तिने असंही म्हटलं होतं की, तिचे वडिल तिला नाही घेऊन गेले तर, सचिन आमि सुप्रिया यांनी तिला सांभाळलं नाही तसेच त्यांचं नाव देण्यासही नकार दिला.