मुंबई, 16 जुलै : हजारो तरुणींचा क्रश असलेला अभिनेता ललित प्रभाकर (lalit prabhakar) सतत चर्चेत असतो. ललितच्या लुकमुळे अनेक तरुणी त्याच्यावर फिदा तर आहेच मात्र त्याच्या अभिनयानंही अनेकजण त्याला पसंत करतात. ललित सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांसोबत संवाद साधत साधतो. अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांसोबत कनेक्ट राहत असतो. अशातच ललितनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. ललित त्याच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत असतो. अभिनयासोबत तो आपल्या फिटनेसवरही खूप लक्ष देतो. त्याचे चाहते नेहमी त्याला त्याच्या फिटनेसविषयी विचारतात. तो नेहमीच याविषयी काही ना काही टीप्स चाहत्यांसोबत शेअर करताना पहायला मिळतो. नुकताच त्यानं इन्स्टाला फिटनेस संबंधित व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यंचं लक्ष वेधत आहे. ललितच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतंय की तो फिट राहण्यासाठी किती मेहनत घेतोय. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फिटनेसचे प्रकार तो करताना दिसतोय. हेही वाचा - सचिन पिळगांवकरांच्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज; स्पेनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय श्रिया ललितच्या या फिटनेस व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेटंचा वर्षाव होत आहे. ‘मस्त, काय बॉडी आहे, बॉडिगार्ड, फायरचे इमोजी, हर्टचे इमोजी’, अशा अनेक प्रकारच्या कमेंट व्हिडीओवर येत आहेत. काही वेळातच त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानं कुठलेही फोटोशूट किंवा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केल्यावर काही काळातच तो व्हायरल होताना दिसतो. त्याच्या पोस्टवर चाहते नेहमीच कौतुक करत असतात.
दरम्यान, ललितनं सिनेमा, वेबसीरीज, मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनात सोडली आहे. जिवलगा या मालिकेतून त्याचे टीव्हीवर पदार्पण केलं. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेने त्याला खरी ओळख दिली. आभास हा, दिल दोस्ती दुनियादारी, कुंकू या मालिकेतील त्याच्या भूमिका गाजल्या. चि व चि.सौ.का. या सिनेमातून तो पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकला. त्यानंतर त्यानं अनेक हटके सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकरल्या, वेबसरिजमध्येही काम केलं. आता तो एक लोकप्रिय चेहरा बनला आहे. आणि त्याच्या हाताही अनेक प्रोजेक्ट आहेत. ललित हा मुळचा धुळ्याचा असून तो लहानाचा मोठा हा मुंबईमध्येच झाला आहे. नाटकांमध्ये काम करत त्याला अभिनाची आवड जडली. आता तो एक प्रसिद्धा आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.