मुंबई, 22 फेब्रुवारी- अभिनेत्री ह्रता दुर्गुळेचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिची प्रत्येक पोस्टवर चाहते लक्ष ठेवून असतात. मागच्या काही दिवसांपासून ती कुठल्या नवीन प्रोजक्टमध्ये दिसलेली नाही. आता लवकरच ती एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. तिनं तशी सोशल मीडिया पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली आहे. आता ही घोषणा नेमकी कशाबद्दल असणार याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. ह्रता दुर्गुळेने सोशल मीडियावर तिचा जिम आऊटफीटमधील फोटो शेअर करत म्हटलं आहे की, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. यासोबत तिनं काही टॅग देखील दिलं आहेत. हे टॅग लक्षवेधून घेणारे आहेत. तिनं एक टॅग (#announcementsoon #happy #grateful #blessed #hrutadurgule) देत म्हटलं आहे की, लवकरच एक घोषणा करणार आहे… तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी देखील म्हटलं आहे आम्ही तुझ्या घोषणेची वाट पाहत असल्याचे म्हटलं आहे. वाचा- बिग बॉसनंतर सुम्बुल तौकीरचं नशीब चमकलं; हाती लागली मोठी मालिका ह्रता दुर्गुळेला कोणता नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे का, याबद्दल आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. शिवाय ही घोषणा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित आहे का, असा देखील प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. याचं उत्तर आता येणाऱ्या काळातच समोर येईल.
ह्रता दुर्गुळेने मागील वर्षी प्रतिक शाह याच्यासोबत लग्नगाठ बांधली लग्नानंतर ती टाईमपास सिनेमात दिसली. या सिनेमाने चांगलीच कमाई केली. लग्नानंतर तिनं तिचं काम सुरूच ठेवलं आहे. असं जरी असलं तरी नवऱ्यासाठी देखील वेळ काढत असते. त्याच्यासोबतचे काही फोटो व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. या दोघांची जोडी चाहत्यांची आवडती अशीच आहे.
हृताने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केली होती. हृता ही मूळची कोकणातली मात्र ती लहानाची मोठी झाली ती मुंबईत झाली. रामणारायन रुईया कॉलेजमधून शिक्षण घेत असताना तिला अभिनय क्षेत्राची ओढ लागली. आज हृता छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्रीपैकी एक आहे.