मुंबई, 8 जून- अभिनेत्री ह्रता दुर्गुळेकडे (hruta durgule ) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. आता ह्रता दुर्गुळे मोठ्या पडद्याकडे देखील वळली आहे. लवकरच तिचे दोन सिनेमे भेटीला येत आहेत. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढतच आहे. सोशल मीडियावर तिचा प्रचंड चाहता वर्ग आहे. तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते अगदी अतुर असतात. तिच्या चाहते मंडळीसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने(hruta durgule instagram ) इन्स्टाग्रामवर 2.5 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. ह्रताने नुकतीच तिच्या इन्स्टा**(hruta durgule 2.5 millions followers instagram)** परिवारासोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. इतका मोठा टप्पा पार करणारी ती मराठीतील पहिली अभिनेत्री ठरली आहे. अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने नुकतीच इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत 2.5 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केल्याची माहिती शेअर केली आहे. तिनं तिच्या चाहत्यांचे धन्यवाद मानले आहेत. तिनं म्हटलं आहे की, मी केवळ तुमच्या प्रेमामुळे आज 2.5 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार करू शकले. तुम्ही नेहमीच माझ्या प्रत्येत नवीन गोष्टींना पाठिंबा दिला …याबद्दल धन्य आहे… मी तुमची नेहमीच कृतज्ञ राहील.. !! ❤️ असं म्हणत तिनं तिच्या चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहे. ह्रता दुर्गुळेच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलेब्सकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा-ह्रता दुर्गुळेला वाटतंय ‘तो’ दिवस कधीच संपू नये.., अभिनेत्रीची नवीन पोस्ट चर्चेत यंदाचं वर्ष ह्रता दुर्गुळेसाठी खास यंदाचं वर्ष ह्रता दुर्गुळेसाठी खास म्हणावे लागेल. कारण तिचे दोना सिनेमे येत आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही सिनेमात तिच्या भूमिका या वेगळ्या आहेत. तिचा वेगळा अंदाज पहिल्यांदा चाहत्यांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. टाईमपास 3 सिनेमातील ह्रता लुक सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. याशिवाय यंदा तिन प्रतीक शाहसोबत लग्न करून नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे. या सगळ्यानंतर आता सोशल मीडियावर देखील ह्रताची हावा पाहायला मिळत आहे. वाचा- मोरे कुटुंब घेणार जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन, ‘सहकुटुंब सहपरिवार’चा विशेष भाग हृताचा छोड्या पडद्यावरील प्रवास हृताने दुर्वा मालिकेतून छोड्या पडद्यावर पदार्पण केले. यानंतर ती फुलपाखरू मालिकेत दिसली. या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. पुढे सिंगिंग स्टार या रिऍलिटी शोमध्ये सूत्रसंचालन करताना ती दिसली. दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक आणि स्ट्रॉबेरी शेक ही शॉर्टफिल्म तिने अभिनित केली. अनन्या या चित्रपटातून हृता प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे हा चित्रपट तिच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट व ड्रीमविवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव यांच्या अनन्या या आगामी चित्रपटातून हृता एक आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.
छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्री हृताने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केली होती. हृता ही मूळची कोकणातली मात्र ती लहानाची मोठी झाली ती मुंबईत झाली. रामणारायन रुईया कॉलेजमधून शिक्षण घेत असताना तिला अभिनय क्षेत्राची ओढ लागली. आज हृता छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्रीपैकी एक आहे.