'बिग बॉस' हा असा रिऍलिटी शो आहे, ज्याद्वारे अनेक चेहऱ्यांचं नशीब बदललं आहे. याशोमुळे काहींना पूर्वीपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे तर काहींना आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे.
'बिग बॉस 16' च्या स्पर्धकांसोबतही असंच काहीसं घडत आहे. 'बिग बॉस' नंतर या टीव्ही सेलेब्सला चांगल्या ऑफर्स मिळत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, झी टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'कुंडली भाग्य'मध्ये सुम्बुल तौकीरची वर्णी लागल्याचं सांगितलं जात आहे.