मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /पूरग्रस्तांना पाहून दीपाली सय्यदला अश्रू अनावर; कोट्यवधींच्या मदतीचं दिलं आश्वासन

पूरग्रस्तांना पाहून दीपाली सय्यदला अश्रू अनावर; कोट्यवधींच्या मदतीचं दिलं आश्वासन

 अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayyad) देखील पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पोहोचली होती. यावेळी तिने कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड तालुक्याची पाहणी केली.

अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayyad) देखील पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पोहोचली होती. यावेळी तिने कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड तालुक्याची पाहणी केली.

अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayyad) देखील पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पोहोचली होती. यावेळी तिने कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड तालुक्याची पाहणी केली.

मुंबई 29 जुलै: महाराष्ट्रावर सध्या पूराचं मोठं संकट ओढवलं आहे. अनेक ठिकाणी पाणी शिरून लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच राजकीय नेत्यांचे पाहणीसाठी दौरे सुरू आहेत. तर सामाजिक कार्यात नेहमी पुढे येणारी अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayyad) देखील पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पोहोचली होती. यावेळी तिने कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड तालुक्याची पाहणी केली.

दीपाली भोसले सय्यद या तिच्या फाउंडेशनच्या वतीने ती ही पाहणी करण्यासाठी गेली होती. पूराची अतिशय़ बिकट परिस्थिती पाहून तिला अश्रु अनावर होत नव्हते. तिने तेथील स्थानिक नागरिकांशी संवादही साधला. यावेळी बोलताना ती म्हणाली, “भयंकर आहे सगळं. जेव्हा प्रत्येकाशी मी बोलत होते, तेव्हा अंगावर काटा येत होता. लोक धाय मोकलून रडत आहेत. छत नाही, संसार उघडे पडले आहेत. प्रत्येक घराघरात एकच चित्र आहे. दोन वर्षापूर्वीही असंच झालं होतं. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, चिपळूण अशा भागात मोठं नुकसान झालं आहे. मी हे चित्र डोळ्याने बघितलं आहे. काहीच उरलं नाही.”

विवादित होतं राज-शिल्पाचं वैयक्तिक आयुष्य; दोघांमधील भांडणाबाबत शर्लिनचा मोठा खुलासा

पुढे तिने म्हटलं की, “दोन वर्ष कोरोना महामारीत गेले. कामधंदा बंद आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप आहे. गावंच्या गावं उद्ध्वस्त झालं आहे. काही उरलं नाही. हे बघाताना भयानक वाटलं. देव किती परीक्षा घेणार? स्ट्राँग आहे म्हणून अजून किती परीक्षा द्यायच्या. कोरोना येतोय, पूर येतोय.” अशा प्रकारे दीपालीने पूरस्थिती पाहून तिच्या भावना व्यक्त केल्या.

तब्बल 2 वर्षांपासून शाकाहारी आहे श्रद्धा कपूर; अभिनेत्रीनं सांगितलं खास कारण

यावेळी दीपाली तेथील एतका वृद्ध महिलेशी संवाद साधला जिने पूरात तिचं सर्वकाही गमावलं होतं. त्या महिलेच्या व्यथा पाहून दीपालीलाही अश्रु अनावर होत नव्हते. तिने त्या महिलेला धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच पूरग्रस्तांसाठी दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट कडून 10 कोटी रुपयांची मदत देखील जाहीर केली आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Rain flood