मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /विवादित होतं राज-शिल्पाचं वैयक्तिक आयुष्य; दोघांमधील भांडणाबाबत शर्लिनचा मोठा खुलासा

विवादित होतं राज-शिल्पाचं वैयक्तिक आयुष्य; दोघांमधील भांडणाबाबत शर्लिनचा मोठा खुलासा

 राज कुंद्रावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. तर शिल्पा आणि राजमध्येही वैयक्तिक आयुष्यात विवाद होते हे ही आता समोर आलं आहे.

राज कुंद्रावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. तर शिल्पा आणि राजमध्येही वैयक्तिक आयुष्यात विवाद होते हे ही आता समोर आलं आहे.

राज कुंद्रावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. तर शिल्पा आणि राजमध्येही वैयक्तिक आयुष्यात विवाद होते हे ही आता समोर आलं आहे.

मुंबई 29 जुलै : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणात प्रत्येक दिवशी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. तर राजच्या अडणींतही दिवसेनंदिवस वाढ होताना दिसतेय. नुकतीच कोर्टाने राजची याचिकाही फेटाळली होती. तर आणखी 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर आता त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. तर शिल्पा आणि राजमध्येही वैयक्तिक आयुष्यात विवाद होते हे ही आता समोर आलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sharlyn Chopra) राजवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. दरम्यान सुरुवातीच्या काळापासूनच शर्लिन या प्रकरणात आहे. फेब्रुवारी महिन्यात राजवर दाखल एफआयआर वेळी शर्लिनने तिचा जवाब नोंदवला होता. तर आता पुन्हा एकदा क्राइम ब्रँचकडे तिने जवाब नोंदवला आहे.

शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टींची पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार, जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप

तिने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं की, 2019 साली सुरुवातीला राज कुंद्राच्या बिजनेस मॅनेजरने एका प्रस्तावासाठी चर्चा करण्यासाठी तिला बोलवलं होतं. 27 मार्च 2019 ला बिजनेस मीटिंग नंतर एक मोठा विवाद झाला ज्यानंतर राज तिला काहीही नं सांगताच तिच्या आला होता.

तब्बल 2 वर्षांपासून शाकाहारी आहे श्रद्धा कपूर; अभिनेत्रीनं सांगितलं खास कारण

पुढे तिने सांगितलं की, त्यावेळी राजने तिला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला. ज्याचा ती विरोध करत होती, तिचं म्हणणं आहे की एका विवाहीत पुरूषाशी तिला संबध ठेवायचे नव्हते. तसेच बिजनेसला एन्जॉयमेंटशी जोडायचंही नव्हतं. तिने सांगितलं की, राजचा विरोध केल्यानंतरही तो थांबत नव्हता. त्यामुळे ती फारच घाबरली होती. काही वेळानंतर तिने त्याला धक्का दिला व ती वॉशरुमध्ये गेली. याच दरम्यान राजने त्याच्यात आणि शिल्पामध्ये चांगले सबंध नसल्याचं सांगितलं होतं. तर घरी असताना जास्तीत जास्त वेळ तो तणावात असतो असंही तो म्हणाला होता.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Raj kundra, Shilpa shetty