मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /तब्बल 2 वर्षांपासून शाकाहारी आहे श्रद्धा कपूर; अभिनेत्रीनं सांगितलं खास कारण

तब्बल 2 वर्षांपासून शाकाहारी आहे श्रद्धा कपूर; अभिनेत्रीनं सांगितलं खास कारण

नुकताच ‘वर्ल्ड नेचर कंजरवेशन डे’ साजरा करण्यात आला. अभिनेत्री श्रद्धा कपूरनेसुद्धा हा दिवस साजरा केला. यानिमित्ताने तिने ‘शाकाहारी’ होण्याची दोन वर्षेसुद्धा पूर्ण करण्याचा आनंद व्यक्त केला आहे.

नुकताच ‘वर्ल्ड नेचर कंजरवेशन डे’ साजरा करण्यात आला. अभिनेत्री श्रद्धा कपूरनेसुद्धा हा दिवस साजरा केला. यानिमित्ताने तिने ‘शाकाहारी’ होण्याची दोन वर्षेसुद्धा पूर्ण करण्याचा आनंद व्यक्त केला आहे.

नुकताच ‘वर्ल्ड नेचर कंजरवेशन डे’ साजरा करण्यात आला. अभिनेत्री श्रद्धा कपूरनेसुद्धा हा दिवस साजरा केला. यानिमित्ताने तिने ‘शाकाहारी’ होण्याची दोन वर्षेसुद्धा पूर्ण करण्याचा आनंद व्यक्त केला आहे.

मुंबई, 29 जुलै- बॉलिवूडची (Bollywood) आशिकी गर्ल श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) प्राण्यांवर किती प्रेम करते हे सर्वांनाचं माहिती आहे. तिच्या इन्स्टाग्राम पेजवर प्राण्यांच्या अनेक पोस्ट पाहायला मिळतात. ती बहुतांश मोकळा वेळ आपल्या पाळीव प्राण्यांसोबत घालवत असते. इतकचं नव्हे तर आपल्या या लाडक्या पाळीव प्राण्यांचा ती वाढदिवससुद्धा साजरा करते. त्यामुळे श्रद्धाचं सगळेच कौतुक करत असतात. श्रद्धाने पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडियावर (social Media Post) एक पोस्ट शेयर करत, आपलं प्राणीप्रेम व्यक्त केलं आहे. पाहूया काय आहे, ही नेमकी पोस्ट.

नुकताच ‘वर्ल्ड नेचर कंजरवेशन डे’ साजरा करण्यात आला. अभिनेत्री श्रद्धा कपूरनेसुद्धा हा दिवस साजरा केला. यानिमित्ताने तिने ‘शाकाहारी’ होण्याची दोन वर्षेसुद्धा पूर्ण करण्याचा आनंद व्यक्त केला आहे. आणि यानिमित्ताने आपल्या चाहत्यांनासुद्धा शाकाहारी आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. श्रद्धाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये तिने आपल्या खाण्याच्या आवडीनिवडी सांगितल्या आहेत. सोबतचं आपण गेली 2 वर्षे शाकाहारी असल्याचं सांगितलं आहे. तसेच आनंद व्यक्त करत श्रद्धा म्हणते, ‘खूप मित्र बनवण्याची ही दोन वर्षे, फक्त आणि फक्त जेवणासाठी कोणालाही त्रास न देण्याची ही 2 वर्षे, प्राण्यांवर प्रेम करण्याची ही 2 वर्षे’. यावरून पुन्हा एकदा श्रद्धाची भूतदया दिसून आली आहे.

(हे वाचा: 'बसपन का प्यार' गाण्याने उडवली अनुष्का शर्माची झोप; पोस्ट शेयर करत म्हणाली...)

इतकचं नव्हे तर अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपल्या सर्व चाहत्यांना शाकाहारी आहार घेण्याचं आवाहन केलं आहे. श्रद्धाच्या या मोठ्या मनाचं सध्या सर्वत्र कौतुक होतं आहे. श्रद्धा बॉलिवूडची एक उत्तम अभिनेत्री तर आहेच. मात्र यापलीकडे ती एक उत्कृष्ट माणूससुद्धा आहे. तिचा हळवं मन अनेक गोष्टींमधून दिसून येतं. त्यामुळेचं श्रद्धा सर्वांची लाडकी अभिनेत्री समजली जाते. श्रद्धाच्या पोस्टवर फक्त चाहतेचं नव्हे तर अनेक कलाकारसुद्धा कमेंट्स करून तिचं कौतुक करत आहेत. भूमी पेडणेकर, सिद्धांत कपूर, जेकलीन फर्नांनडीस या कलाकारांचा यामध्ये समावेश आहे. आपल्या माणूसकीने श्रद्धाने पुन्हा एकदा सर्वांचं मन जिंकलं आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Shraddha kapoor