मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /भार्गवी चिरमुलेने Navratri निमित्त नेसलेल्या 'या' साडीचं महत्त्व माहितेय का?

भार्गवी चिरमुलेने Navratri निमित्त नेसलेल्या 'या' साडीचं महत्त्व माहितेय का?

मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले (Bhargavi Chiramule) हिने खास फोटोशूट केलं आहे. यात तिने पांढऱ्या रंगांची, लाल किनार असलेली बंगाली पद्धतीची साडी परिधान केली आहे.

मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले (Bhargavi Chiramule) हिने खास फोटोशूट केलं आहे. यात तिने पांढऱ्या रंगांची, लाल किनार असलेली बंगाली पद्धतीची साडी परिधान केली आहे.

मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले (Bhargavi Chiramule) हिने खास फोटोशूट केलं आहे. यात तिने पांढऱ्या रंगांची, लाल किनार असलेली बंगाली पद्धतीची साडी परिधान केली आहे.

मुंबई , 11 ऑक्टोबर : शारदीय नवरात्रौत्सवाचे (Navratri 2021)औचित्य साधत मराठी सिनेसृष्टीतील अनेकक कलाकार गेल्या काही दिवसांपासून विविध फोटो शेअर करत आहेत. आजचा नवरात्रीचा दिवस पाचवा आहे. आज पांढऱ्या रंगाचा मान आहे. याचेच निमित्त निमित्त साधत मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले (Bhargavi Chiramule) हिने खास फोटोशूट केलं आहे. यात तिने पांढऱ्या रंगांची, लाल किनार असलेली बंगाली पद्धतीची साडी परिधान केली आहे. इतकचं नाही तर तिने या साडीचं महत्त्व देखील सांगितलं आहे. सोबतच एक संदेशही दिला आहे.

भार्गवी चिरमुलेने इन्स्टावर तिचे बंगाली बंगाली पद्धतीच्या साडीतील काही सुंदर फोटो शेअर करत म्हटले आहे की,‘तात’ साडी ही पारंपारिक बंगाली साडी आहे. भारतीय उपखंडातील गरम आणि दमट हवामानासाठी ही सर्वात आरामदायक साडी मानली जाते. 'लाल पार 'अर्थात लाल काठ असलेली पांढरी साडी सामान्यतः आपल्या देशातील ईशान्य राज्यांमध्ये धार्मिक प्रसंगांसाठी राखीव असते, असे तिने म्हटले आहे.

पांढरा म्हणजे शुद्धता आणि लाल हे सौभाग्यतेचे प्रतीक आहे. सण साजरे करूया आणि सोबत आपल्या कलांचे पण जतन करूयात..हातमाग उत्पादनांचा वापर सुरू करून आपल्या विणकरांना आधार देवूया, असा संदेशही तिने चाहत्यांना दिला आहे.

वाचा :नुसरत जहाँ यांनी गुपचूप उरकलं लग्न? बाळाच्या जन्माबाबतही केला मोठा खुलासा

अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने 'वहिनीसाहेब', 'अनुबंध', 'असंभव', 'पिंजरा', ‘मेरे साई’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ अशा अनेक मालिकांमध्ये काम करत अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यासोबतच भार्गवीने आतापर्यंत 'संदूक', 'आयडियाची कल्पना', 'धागेदोरे', 'अनवट' अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. भार्गवी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती नृत्यात देखील पारंगत आहे. भार्गवीने भरतनाट्यमचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे.

वाचा :Bigg Boss Marathi 3 च्या घरातील 'या' स्पर्धकामुळे सोनाली झाली Emotional, पाहा Video

शारदीय नवरात्रौत्सवाचे औचित्य साधत मराठी सिनेसृष्टीतील शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर गेल्या काही दिवसांपासून रोज देवीच्या विविध रुपातील फोटो शेअर करत आहे व देवीच्या प्रत्येक रुपासोबतच तिचं माहात्म्यसुद्धा ती सांगणाताना देखील दिसत आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Navratri