Home /News /entertainment /

Bigg Boss Marathi 3 च्या घरातील 'या' स्पर्धकामुळे सोनाली झाली Emotional, पाहा Video

Bigg Boss Marathi 3 च्या घरातील 'या' स्पर्धकामुळे सोनाली झाली Emotional, पाहा Video

मीनलच्या (meenal shah) वागणुकीमुळे सोनाली आणि विशाल दुखावले आहेत.सोनालीला याच कारणामुळे अश्रु अनावर झाले, आणि ती विशालसमोर मन मोकळं करताना दिसणार आहे.

  मुंबई , 11 ऑक्टोबर : बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi season 3)घरामध्ये अनेक सदस्यांना भावुक होताना बघितले आहे. कधी दुसर्‍यांच्या वाईट बोलण्याने तर कधी घराच्यांच्या आठवणीने तर कधी घरातल्याच एखाद्या जवळच्या सदस्याच्या वागणुकीमुळे. तसंच काहीसं सोनालीसोबत (sonali patil) आज झालं आहे. मीनलच्या (meenal shah) वागणुकीमुळे सोनाली आणि विशाल दुखावले आहेत. सोनालीला याच कारणामुळे अश्रु अनावर झाले, आणि ती विशालसमोर मन मोकळं करताना दिसणार आहे. सोनालीच म्हणण आहे “इतक पण अंडरस्टॅंडिंग नाहीये का ? मला मीनलचं वागणं नाही आवडलं. इतक कोणाला इग्नोर करण बरं नाही. मला इतक वाईट कधीच नाही वाटलं. सोनाली विशालला सांगताना दिसत आहे की, मी या घरात आल्यापासून कधीच घरच्यांची आठवण आली म्हणून रडली नाही मात्र आज मीनलचे असे वागणे मला पटत नाही त्यामुळे मला खूप वाईट असल्याचे ती रडत रडत विशालला सांगताना दिसत आहे.
  आता सोनाली मीनलच्या वागण्यामुळे दुखवली आहे हे खरे आहे पण हे सगळे मीनलला समजल्यावर मीनल कशी रिअॅक्ट होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात सोनाली पाटील, विशाल निकम आणि मीनल शाह यांच्यात चांगलीच मैत्री झाल्याची दिसते. सोनली मीनल आणि विशालसोबत सर्व गोष्टी शेअर करताना दिसते. त्यामुळे आता यामुळे या तिघांच्या मैत्रीत फूट पडणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वाचा :Bigg Boss marathi 3च्या घरात एंट्री करताचा आदिश वैद्यला मिळाला हा मोठा अधिकार ; तीन स्पर्धकांना द्यावी लागणार परीक्षा मीनल शाह कोण आहे ? मीनलचा जन्म मुंबईत झाला आहे. ती लहान असतानाच तिचे आई आणि वडील दोघेही विभक्त झाले होते त्यामुळे मीनल आणि तिच्या भावाचा सांभाळ तिच्या आईनेच केला आहे. वडील गुजराती जरी असले तरी तिची आई मराठी असल्याने त्या दोघांचे शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले. तिचे शालेय शिक्षण वांद्रे पूर्व येथील आयइएस न्यू इंग्लिश स्कूल मराठी माध्यमातून झाले होते. त्यामुळे मराठी भाषेची तिला उत्तम जाण आहे. शिवाय आई मराठी असल्याने तिला मराठी संस्कृतीबद्दल विशेष आदर देखील आहे. वाचा : Amitabh Bachchan Birthday: बिग बींनी वाढदिवशी घेतला मोठा निर्णय ; ट्रोलिंगला कंटाळून पानमसाला कंपनीसोबतचा करार संपवला मीनल एक उत्तम डान्सर आहे यासोबतच तिला अभिनयाची आवड देखील आहे. तिने मॉडेलिंग देखील केली आहे. 2017 साली एम टीव्हीच्या रोडीज या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये ती कंटेस्टंट बनून गेली होती. यात कठीण टास्क खेळून ती सेमी फायनलिस्टपर्यँत पोहोचली होती. रोडीज या रिअॅलिटी शोमुळे मिनलला तुफान प्रसिद्धी मिळाली अगदी सोशल मीडियावर तिच्या फॅनफॉलोअर्सची संख्या देखील वाढली होती. नानचाकू आणि मार्शलआर्टस्चे प्रशिक्षण घेतलेल्या मिनलला वेगवेगळ्या टास्कदरम्यान याचा खूप फायदा झाला होता. या शोनंतर मीनलने काही जाहीरातीत देखील दिसली. यामुळेच ती मनोरंजन क्षेत्राशी जोडली गेली.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Colors marathi, Marathi entertainment

  पुढील बातम्या