मुंबई, 23 सप्टेंबर : अनेक सेलिब्रिटींसाठी आणि इन्फ्लूएन्सर्ससाठी सोशल मीडिया त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या, त्यांच्या आयुष्याबद्दल अपडेट्स दिले. आणि सोशल मीडियाचा हा वापर नेहमीच चालू राहील. मात्र लॉकडाऊनच्या काळात 'सोशल डिटॉक्स' हा ट्रेंड देखील काही जणांनी फॉलो केला. अर्थात काही काळासाठी सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसपासून दूर राहणे. काहींना शक्य झालं तर काहींचे जगणच सोशल मीडियाभोवती असल्याने ते अशक्यप्राय होतं. सध्या सर्व काही सोशल मीडियावर व्यक्त करण्याचा ट्रेंड सुरू असताना मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याने ट्विटरला अलविदा केले आहे.
(हे वाचा-हृतिक रोशनने रिक्षाचालकाच्या मुलाला दिले 3 लाख रुपये, पूर्ण करायचं होतं स्वप्न)
सुबोध भावेने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत ट्विटर अकाऊंट डिलिट करत असल्याची माहिती दिली आहे. त्याने असे म्हटले आहे की, 'आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मी माझे ट्विटर अकाउंट डिलिट करतो आहे. काळजी घ्या ,मस्त रहा! जय महाराष्ट्र, जय हिंद'.
आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद.
मी माझा ट्विटर अकाउंट डिलिट करतो आहे.
काळजी घ्या ,मस्त रहा!
जय महाराष्ट्र
जय हिंद🙏🙏🙏
— Subodh Bhave (@subodhbhave) September 23, 2020
ट्विटरचा कंटाळा आल्याने अकाऊंट डिलिट करत असल्याची माहिती समोर आली आहे. एबीपी माझाशी बोलताना त्याने याबाबत प्रतिक्रिया दिली. तो असं म्हणाला आहे की, 'मी ट्विटरवरून बाहेर पडण्याचं विशेष कारण नाही पण कंटाळा आला आहे. इतर कुठेही वेळ घालवता येईल. त्यामुळे मी ट्विटर सोडत आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामबाबत इतक्यात नाही सांगू शकत पण फेसबुकबाबत देखील असा निर्णय घेऊ शकतो.' अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
(हे वाचा-PHOTOS : जगातल्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये खान बच्चन नव्हे, आहे हा अभिनेता)
ट्विटरवर सध्या सुबोधचे 94.6 हजार फॉलोअर्स आहेत. सुबोधची ज्याप्रमाणे प्रशंसा केली जाते त्याप्रमाणे सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगची शिकार देखील व्हावे लागले आहे, त्यामुळेच त्याने ट्विटरला अलविदा केल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.