जगातील सर्वांत प्रभावी 100 व्यक्तींमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर एक भारतीय अभिनेत्याचं नाव आलं आहे.
जगभरातल्या मोठ्या नेत्यांबरोबर तितकीच प्रभावी व्यक्ती म्हणून एकमेव भारतीय अभिनेत्याचं नाव आलंय आणि खान, बच्चन, कुमार नव्हे तर हा अभिनेता.
जगातल्या सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी Time मॅगझिनने जाहीर केली त्यात आयुष्मान खुरानाचं नाव आहे. तो या यादीतला एकमेव भारतीय अभिनेता आहे.
2012 मध्ये 'विकी डोनर' या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत कारकिर्दीत त्यानं अनेक चित्रपट केले असून, यासाठी त्याला विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत.
'अंधाधुन' चित्रपटाlतील अभियासाठी आयुष्मानला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र आता त्याचा आणखी मोठा सन्मान करण्यात आला असून जगातील सर्वांत प्रभावी 100 व्यक्तींमध्ये त्याची निवड करण्यात आली आहे.
टाइम मॅगझिनने जाहीर केलेल्या या यादीमध्ये आयुष्मान खुरानाबरोबरच गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, एचआयव्हीवर संशोधन करणारे रवींद्र गुप्ता आणि शाहीनबाग आंदोलनात सहभागी असणाऱ्या बिल्किस यांच्या नावाचाही समावेश या यादीमध्ये आहे
नरेंद्र मोदी, आयुष्मान खुरानाबरोबरच जगभरातील विविध नेत्यांचादेखील या यादीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये डोनल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, तैवानच्या राष्ट्रपती त्साई इंग वेन, जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मर्केल, अमेरिकी नेते जो बायडेन आणि कमला हॅरिस यांनाही यात स्थान मिळालं आहे.
आयुष्मानने ही पोस्ट टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनं त्याचं अभिनंदन केलं आहे. 'आयुष्यमानला 'विकी डोनर' चित्रपटापासून ओळखते. अभिनयाच्या बळावर त्यानी इथपर्यंत मजल मारली आहे. आयुष्मानने महिलांच्या भूमिकाही उत्तम वठवल्या आहेत. त्यामुळे जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्याचं नाव येणं, सहाजिक आहे', असं तिने म्हटलंय.