मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘रात्री 2 वाजता दिलिपजींचा फोन आला, अन्..’; सचिन पिळगांवकरांनी सांगितली खास आठवण

‘रात्री 2 वाजता दिलिपजींचा फोन आला, अन्..’; सचिन पिळगांवकरांनी सांगितली खास आठवण

सचिन यांना बालवयातचं दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याच भाग्य लाभलं होतं.

सचिन यांना बालवयातचं दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याच भाग्य लाभलं होतं.

सचिन यांना बालवयातचं दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याच भाग्य लाभलं होतं.

मुंबई, 7 जुलै- आज भारतीय चित्रपटसृष्टीचं कधीही न भरून निघणारं असं नुकसान झालं आहे. आज बॉलिवूड (Bollywood) लेजेंड दिलीप कुमार (Dilip Kumar)  यांचं निधन झालं आहे. त्यामुळे चाहत्यांसह संपूर्ण मनोरंजनसृष्टी दुखात बुडाली आहे. सर्व कलाकार दिलीप कुमार यांना श्रद्धांजली देत त्यांच्यासोबतच्या खास आठवणींना उजाळा देत आहेत. नुकताच अभिनेता सचिन पिळगांवकर (Sachin pilgaonkar) यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर करत दिलीप कुमार यांना आदरांजली वाहिली आहे.

मराठी अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी एक बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांना आपल्या बालवयातचं दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याच भाग्य लाभलं होतं. दिलीप कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला फार मोठं योगदान दिलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या यशामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आज त्यांच्या जाण्याने सर्वच लोक दुखात बुडाले आहेत. आज चित्रपटसृष्टीतील एक काळ संपला अशा भावना सर्वजण व्यक्त करत आहेत.

(हे वाचा: दिलिप कुमार यांनी इंग्रजांविरुद्ध दिलं होतं भाषण; टाकलं होतं तुरुंगात )

अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्यासोबतचा आहे. हा व्हिडीओ शेयर करत सचिन यांनी आठवणींना उजाळा दिला आहे, त्यांनी कॅप्शन देत म्हटलं आहे, ‘आपल्या सर्वांनाचं अपेक्षा होती की, दिलीपजी आरोग्यदाई आयुष्याची शंभर वर्षे पूर्ण करतील. मात्र देवाच्या मनात काही वेगळच होतं. परमेश्वरालाही वाटलं असेल, त्यांना या आजारपणामुळे त्रास देण्याऐवजी चेहऱ्यावर असणाऱ्या हास्यासोबत आपल्याकडे बोलवून घ्यावं. त्यांच्यासोबत नेहमीच खंबीरपणे उभ्या असणाऱ्या आणित्यांच्या आयुष्यातील प्रत्येक चढउतारात साथ देणाऱ्या सायरा आपासोबत माझी प्रार्थना आहे, यावेळेत त्यांना धैर्य लाभो, असं त्यांनी म्हटलं आहे.

(हे वाचा:धक्कादायक! दिलीप कुमारांच्या निधनानंतर सायराबानू विषयी 'हे' केलं जातयं Search)

पुढे त्यांनी सांगितलं आहे, ‘बालवयात मी ‘दास्तान’ या चित्रपटात त्यांच्या बालपणीची भूमिका साकारली आहे. तर ‘बैराग’ या चित्रपटात त्यांच्या मुलाची भूमिका साकरली होती. तर 1976 एक किस्सा सांगत त्यांनी म्हटलं आहे, ‘1976 मध्ये मी फिल्मेफेअरमध्ये एक डान्स केला होता. त्यावेळी रात्री 2 वाजता माझ्या घरी एक फोन आला, आणि तो माझ्या बाबांनी उचलला. त्यावेळी तिकडून दिलीप कुमारजी बोलत होते. त्यांनी माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मला म्हटलं की मी तुझा डान्स खूप एन्जॉय केला. तू पुढे जाऊन एक उत्तम डान्सर म्हणूनही ओळखला जाशील. आणि ज्यावेळी मी आणि सुप्रियाने ‘नच बलिये’ हा शो जिंकला त्यावेळी मला त्यांचे ते शब्द आठवले. ते माझ्यासाठी खुपचं खास होते. ते नेहमीच सर्वांसाठी एक लेजेंड राहतील.

First published:

Tags: Bollywood, Dilip kumar, Sachin pilgaonkar