‘कबीर सिंग’ला मिळालेल्या यशानंतर एकीकडे शाहिद कपूरनं आपल्या मानधनात वाढ केली तर दुसरीकडे अभिनेत्री कियारा अडवाणीला नव्या सिनेमांच्या ऑफर येऊ लागल्या आहेत. या सिनेमामुळे कियारा प्रकाशझोतात आली. त्यानंतर नुकतीच अमित अग्रवालसाठी रॅम्पवर उतरली.
अमित अग्रवालच्या या शोसाठी कियारा शो स्टॉपर म्हणून उतरली. यावेळी तिनं लाल रंगाचा लेहंगा घातला होता आणि कॉन्ट्रास ग्रीन ज्वेलरीच्या सहाय्यानं तिनं लुक कंप्लिट केला होता.
सध्या कियारा तिच्या फिटनेस खूप लक्ष देत आहे. काही दिवसांपूर्वीच ती एका डान्स क्लासच्या बाहेर स्पॉट झाली होती.
वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर कियारा लवकरच एका वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील तिच्या अगोदरच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी असणार आहे. ही वेब सीरिजची निर्मिती करण जोहरच्या प्रॉडक्शन हाउसमध्ये करण्यात येणार आहे.
या फॅशन शो कियारानं तिच्या ग्लॅमरस लुकनं सर्वांची मनं जिंकली. तिचा हा लुक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मात्र असं असतानाही काही लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
कियाराचे या शो मधील फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यावर एका युजरनं, 'प्रीती चुन्नी ठीक करो अशी कमेंट केली आहे.'
कबीर सिंह सिनेमापूर्वी कियारा लस्ट स्टोरीज या वोब सीरिजमध्ये दिसली होती. यामध्ये तिनं विकी कौशलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. पण 'कबीर सिंह' सिनेमानं तिला लोकप्रियता मिळवून दिली.