जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Chahatt Khanna Case: अभिनेत्रीने पतीवर केले होते अनैसर्गिक संभोगाचे धक्कादायक आरोप; कोर्टाने दिले हे आदेश

Chahatt Khanna Case: अभिनेत्रीने पतीवर केले होते अनैसर्गिक संभोगाचे धक्कादायक आरोप; कोर्टाने दिले हे आदेश

Chahatt Khanna Case: अभिनेत्रीने पतीवर केले होते अनैसर्गिक संभोगाचे धक्कादायक आरोप; कोर्टाने दिले हे आदेश

चाहत खन्नाने फरहानवर बलात्कार आणि अनैसर्गिक संभोगाचा आरोप (arrest) केला होता. तिच्या पतीने या कृत्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं चाहत खन्नाने म्हटलं होतं.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 1 ऑक्टोबर- टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नापासून (Chahatt Khanna) विभक्त झालेला तिचा पती फरहान शाहरुख मिर्झाला (Farhan Shahrukh Mirza) कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत दिलासा दिला आहे. न्यायालयाने (court) फरहानच्या अटकेला स्थगिती दिली आहे. चाहत खन्नाने फरहानवर बलात्कार आणि अनैसर्गिक संभोगाचा आरोप (arrest) केला होता. तिच्या पतीने या कृत्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं चाहत खन्नाने म्हटलं होतं.

    जाहिरात

    या प्रकरणावर सुनावणीदरम्यान न्या. अजय रस्तोगी आणि न्या. अभय एस. ओक यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच 8 नोव्हेंबरपर्यंत आरोपीच्या अटकेला स्थगिती दिली. याचिकाकर्त्याला पुढील आदेश येईपर्यंत पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचा आदेशही कोर्टाने दिला आहे. याबाबतचं वृत्त ‘झी न्यूज’ने दिलं आहे. फरहान शाहरुख मिर्झाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देऊन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. (**हे वाचा:** इथं 21 रात्र नग्नावस्थेत जंगलात राहतं कपल; तुम्ही पाहिलाय हा अजब रिअ‍ॅलिटी शो? ) चाहत खन्ना हिने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. ‘माझा पती काहीही काम करत नाही आणि कमावत नाही. पैशांसाठी वारंवार त्रास देतो. मी तापाने फणफणलेली असतानाही पती शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती करत होता. तो सायकोफँट आहे. त्यामुळेच त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता,’ असं चाहतने म्हटलं होतं. दुसरीकडे, फरहान मिर्झा यानंदेखील पत्नी चाहत खन्नावर आरोप केले आहेत. चाहतचं आपल्या भावासोबत अफेयर असल्याचा आरोप फरहाननं केला आहे. चाहत खन्नाने पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर 2013 मध्ये फरहान मिर्झासोबत दुसरं लग्न केलं होतं. चाहतने मध्यंतरी आपलं दुःख सोशल मीडियावर शेअर केलं. तिनं म्हटलं होतं, की काम नसल्यामुळे तिच्याकडची जमापुंजी संपण्याच्या मार्गावर आहे. ती कसंबसं दोन मुलींचं पालनपोषण करत आहे. आपल्याला कामाची खूप गरज असून, आधीपेक्षाही चांगलं काम करू शकते, असा आत्मविश्वास चाहतनं बोलून दाखवला होता. (**हे वाचा:** Sonam Kapoor ने कपडे घालताना मागितली पती आनंदकडे मदत ; त्याने बनवला व्हिडिओ ) चाहत खन्ना एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. वयाच्या १६व्या वर्षापासून ती छोट्या पडद्यावर सक्रिय आहे. २००२ साली ‘सच्ची बात सभी जग जाने’ या टीव्ही शोमधून तिने पदार्पण केलं. काही चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारली आहे. ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतल्या भूमिकेमुळे चाहत घराघरात पोहोचली. चाहत खन्ना सिंगल मदर म्हणून दोन मुलींचं संगोपन करत आहे. आता चाहत बऱ्याच काळापासून कामाच्या शोधात आहे. याशिवाय ती कपड्यांचा व्यवसायही करत आहे. चाहत खन्नाचे आतापर्यंतचे दोन्ही विवाह अयशस्वी झाले आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात