मानसी नाईक नेहमीच आपल्या हटके अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेते. मानसी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत येत असते.दरम्यान मानसी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच मानसी नाईकने एक इंटरेस्टिंग फोटो शेअर केला आहे. मानसी नाईकने इन्स्टाग्रामवर बेबी बम्पसह फोटो शेअर करत सर्वांचंचं लक्ष वेधलं आहे.
मानसीच्या एका हातात चॉकलेट आहे. तर दुसर्याने हाताने ती आपलं बेबी बम्प दाखवत आहे. मात्र फोटो शेअर करत तिने लवकरचं असं कॅप्शन दिल आहे.मात्र हा फोटो पाहून चाहते संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी मानसीला ट्रोल केलं आहे. एका यूजरने कमेंट करत म्हटलं आहे, 'खुप जास्त प्रगती आहे', तर काहींनी हे इतक्या फास्ट कसं झालं'
त्यामुळे मानसी नाईक रियलमध्ये प्रेग्नेंन्ट नसून हा तिच्या आगामी प्रोजेक्ट्चा लूक असल्याचं म्हटलं जात आहे. काहींनी मानसीला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी मानसीला ट्रोल केलं आहे.मानसीने काही महिन्यांपूर्वी बॉक्सर प्रदीप खरेरासोबत लग्न केलं आहे. या दोघांची जोडी सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. ते सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.
हे दोघेही बरेच दिवस एकमेकांना डेट करत होते. मैत्री आणि त्यानंतर प्रेम असा यांचा प्रवास आहे. मानसी ही महाराष्ट्रीयन आहे तर प्रदीप हरियाणाचा आहे. त्यामुळे या दोघांमध्ये 2 संस्कृतींचं दर्शन पाहायला मिळत. मानसी सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. प्रदीपसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. हे दोघे एका यूटयूब वाहिनीच्या माध्यमातूनही चाहत्यांचं मनोरंजन करत असतात.