मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Manava Naik: मनवा नाईकचा छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत महत्त्वाची भूमिका!

Manava Naik: मनवा नाईकचा छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत महत्त्वाची भूमिका!

एक यशस्वी निर्माती म्हणून ओळख असणारी मराठी अभिनेत्री मनवा नाईक (manava naik comeback) एका महत्त्वाच्या भूमिकेतून टीव्हीवर पदार्पण करणार आहे. अनेक दिवसांनी ती छोट्या पडद्यावर अभिनेत्रीच्या रूपात दिसणार आहे.

एक यशस्वी निर्माती म्हणून ओळख असणारी मराठी अभिनेत्री मनवा नाईक (manava naik comeback) एका महत्त्वाच्या भूमिकेतून टीव्हीवर पदार्पण करणार आहे. अनेक दिवसांनी ती छोट्या पडद्यावर अभिनेत्रीच्या रूपात दिसणार आहे.

एक यशस्वी निर्माती म्हणून ओळख असणारी मराठी अभिनेत्री मनवा नाईक (manava naik comeback) एका महत्त्वाच्या भूमिकेतून टीव्हीवर पदार्पण करणार आहे. अनेक दिवसांनी ती छोट्या पडद्यावर अभिनेत्रीच्या रूपात दिसणार आहे.

मुंबई 27 जून: सोनी मराठीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ (Tumchi Mulgi Kay Karte) ही एक अत्यंत ट्विस्ट अँड टर्नने भरलेली मालिका सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. बऱ्याच दिवसांनी एक सस्पेन्स वाढवणारी आई मुलीच्या नात्याची गोष्ट प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडत आहे एवढं मात्र नक्की. या मालिकेत सध्या एका नव्या पात्राची एंट्री झाली आहे आणि त्याच निमित्ताने एक अभिनेत्री बऱ्याच दिवसांनी टीव्ही जगतात पुन्हा कमबॅक करत आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून (Manava Naik) मनवा नाईक आहे. मनवा गेल्या अनेक वर्षांपासून एक यशस्वी अभिनेत्री म्हणून करिअर घडवत आहे. त्याचसोबत ती काही मोजक्या पण दर्जेदार महिला निर्मत्यांपैकी एक सुद्धा आहे. मनवाच्या ‘स्ट्रॉबेरी पिक्चर्स’ या प्रॉडक्शन हाऊसच्या अनेक मालिका वेगवेगळ्या वाहिन्यांवर सुरु आहेत आणि त्या अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहेत. अशातच मनवा एका यशस्वी निर्मतीसोबत पुन्हा (Manava Naik Comeback) अभिनयाकडे वळताना दिसत आहे.

‘तुमची मुलगी काय करते’ याच मालिकेत मनवा डॉ. निलंजना वर्मा हे पात्र साकारताना दिसणार आहे. काहीच दिवसांपूर्वी या मालिकेतील तिच्या पात्राचा प्रोमो सोनी मराठीच्या सोशल मीडियावरून पोस्ट करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये श्रद्धा मिरजकर म्हणजे सावनीच्या आईशी निलंजना बोलताना दिसत आहे. सावनीची तब्येत सुधारावी यासाठी निलंजना यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

ही मालिका एका सुंदर वळणावर आली असून अखेर सावनी मालिकेत सापडली आहे. पण प्रकरण अजूनही पूर्णपणे संपलेलं नाही.(Tumchi Mulgi Kay Karte latest update)  सावनीला झालेल्या प्रकारचा मोठा धक्का बसला असून यातून तिला बाहेर काढण्यासाठी डॉ. निलंजना यांची नेमकुं करण्यात आली आहे. आता त्यांच्या मदतीने सावनी कशी ठीक होते आणि प्रकरणाचा छडा कधी व कसा लागतो हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे.

मनवा याआधी झी मराठीवरील ‘तुझं माझं जमेना’ या मालिकेत दिसली होती. त्यानंतर मालिकेत मनवाची एंट्री झाली नव्हती.

हे ही वाचा- Hemangi Kavi: 'लेक माझी दुर्गा'च्या कलाकारांनी जुनी जाहिरात केली Recreate! मजेदार VIDEO एकदा पहाच

 मनवा ही अभिनेत्री मीना नाईक यांची कन्या आहे. सध्या ती एक उत्तम निर्माती असून तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्या अनेक मालिका गाजताना दिसत आहेत. बॉस माझी लाडाची, सुंदरा मनामध्ये भरली, आणि तुमची मुलगी काय करते या मालिकांची निर्मिती तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्या असून ती आता कमबॅक करत असल्याने मालिकेत रंगत वाढणार यात शंका नाही.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Producer, Tv serial