मुंबई 27 जून: अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) कायमच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेचा विषय ठरत असते. कधी राजकीय बाबतीत दिलेल्या मतांमुळे तर कधी एकदम धमाल रील्समुळे तिच्याबद्दल चर्चा होत असते. हेमांगी सोशल मीडियावर (Hemangi Kavi Instagram) फारच सक्रिय असते. तिच्या रील्सचे तर लाखो चाहते आहेत. अशातच हेमांगी केलेल्या एका नव्या रीलबद्दल उत्सुकता निर्माण होत आहे.
हेमांगीने नुकतंच एक कमाल रील पोस्ट केलं आहे. ‘लेक माझी दुर्गा’ च्या सेटवरच्या अभिनेत्री यामध्ये धमाल करताना दिसत आहेत. तुम्हाला ती ‘निरमा’ साबणाची (Nirma washing powder ad) जाहिरात आठवते का? त्याच जाहिरातीच्या गाण्यावर ‘लेक माझी दुर्गा’ मालिकेमधील अभिनेत्रींनी रील पोस्ट केलं आहे. ही जाहिरात ज्यावेळी आली तेव्हा त्याच्या अनोख्या गाण्यामुळे ती बरीच लोकप्रिय झाली होती. आजही या जाहिरातीला कोणीच विसरू शकलं नाहीये.
या रीलमध्ये हेमांगीसोबत मृणाल देशपांडे, नियती राजवाडे, सई रानडे अशा अभिनेत्री ‘हेमा, रेखा, जया और सुषमा सबकी पसंद निरमा’ असं म्हणत एका अभिनेत्रीचं म्हणजे पायल मेमाणेचं स्वागत करताना दिसतात. आणि नंतर ‘झालं आता जा!’ असं म्हणून एकदम मजेदार पद्धतीत तिला चेंजिंग रूमबाहेर जायला सांगतात. ‘जा जा तू नवीन आहेस कामावर लक्ष दे’ असं म्हणून बिचाऱ्या पायलची सगळ्याजणी मिळून फजिती करताना दिसतात. हे रील इतकं कमाल विनोदी ढंगात बनवलं आहे की त्यावर अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पडत आहे. मराठीतील अनेक कलाकारांनी सुद्धा हेमांगीचं हे रील बरंच पसंत केलं आहे तसंच चाहत्यांची सुद्धा हसून पुरेवाट झाली आहे.
View this post on Instagram
हेमांगीने या पोस्टमध्ये असं म्हणलं सुद्धा आहे ‘हे कोणतंही पेड प्रमोशन नाही. हा एक विनोदी प्रकार म्हणून शूट केलं आहे आम्ही आमच्या जुनियर्ससोबत व्यवस्थित सामंजस्याने काम करतो. ragging करणं अत्यंत चुकीचं आहे आणि हा कायद्याने गुन्हा आहे.’ कोणत्याही व्यक्तीचा गैरसमज होऊ नये म्हणून हेमांगी हल्ली काळजी घेताना दिसत आहे.
हे ही वाचा- Raanbaazaar webseries: 'रानबाजार'मधल्या भूमिकेसाठी प्राजक्ता फिरली बुधवार पेठेत तर तेजस्विनीने केलं काय!
हेमांगी सध्या ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेत दिसत आहे तर येत्या काळात ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटात ती सूत्रधाराची भूमिका निभावत आहे. ती कायमच तिच्या मतांबद्दल ठाम असते. आपली मतं सोशल मीडियावर स्पष्टपणे मांडताना ती दिसते. त्यामुळे काहीसा तिला ट्रोल सुद्धा केलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Advertisement, Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment