• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • फॉरेस्ट ग्रीन रंगाच्या साडीत खुललं Malaika Aroraचं सौंदर्य; साडीची किंमत ऐकून व्हाल अवाक्

फॉरेस्ट ग्रीन रंगाच्या साडीत खुललं Malaika Aroraचं सौंदर्य; साडीची किंमत ऐकून व्हाल अवाक्

मलायकाने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्री एका फारच सुंदर अशा साडीमध्ये दिसून येत आहे

 • Share this:
  मुंबई, 1 ऑक्टोबर- बॉलिवूड (Bollywood) कलाकार म्हटलं की स्टाईल हे आलंच. हे कलाकार प्रत्येक वेळी आपला लूक मेंटेन करत असतात. यासाठी ते अनेक महागडे ड्रेस किंवा पोशाख परिधान करतात. यामध्ये अभिनेत्री मलायका अरोडासुद्धा(Malaika Arora) मागे नाही. मलायका नेहमीच ग्लॅमरस अंदाजात दिसून येते. मलायकाचे ड्रेस किंवा साडी खूपच महाग असल्याचं आपण अनेकवेळा पाहिलं आहे. नुकताच मलायका अरोराने आपल्या इन्स्टाग्राम आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मलायका एका सुंदर साडीमध्ये दिसत आहे. या साडीची किंमत ऐकून तुम्हालाहीआश्चर्य वाटेल.
  अभिनेत्री मलायका अरोरा एक अभिनेत्री तर आहेच शिवाय ती एक मॉडेल आणि डान्सरसुद्धा आहे. मलायकाला बॉलिवूडमधील एक हॉट आणि तितकीच स्टायलिश गर्ल म्हणून ओळखलं जातं. मलायका सतत सर्वांना फॅशन गोल देत असते. इतकंच नव्हे तर अनेक तरुणी मलायकाला आपला स्टाईल आयकॉन मानतात. आणि या अभिनेत्रीचा प्रत्येक लूक फॉलोसुद्धा करतात. वयाच्या पन्नासाव्या वर्षीही मलायका अतिशय फिट आणि फॅशनेबल दिसून येते. इतकंच नव्हे तर मलायका टॉप मॉडेलिंग शोचं परीक्षणसुद्धा करते. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करून चर्चेत असते. (हे वाचा:Shahrukh Khan करणार मोठा धमाका! अभिनेता पुन्हा दिसणार डबल रोलमध्ये) मलायकाने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्री एका फारच सुंदर अशा साडीमध्ये दिसून येत आहे. फॉरेस्ट ग्रीन कलरच्या या चमकदार साडीमध्ये मलायका अतिशय सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीचा हा लूक तिच्या चाहत्यांना फारच पसंत पडला आहे. तसेच तिची साडीसुद्धा पसंत पडली आहे. युजर्सनी लाईक्स आणि कमेंट्स करत या फोटोंना प्रतिसाद दिला आहे. सध्या अभिनेत्रींचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र या फोटोधमध्ये मलायकाने परिधान केलेली साडी खूपच खास आणि तितकीच महागसुद्धा आहे. याची किंमत आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी फारच जास्त आहे. (हे वाचा:गीता कपूरने सर्वांसमोर आणली खासगी बाब; पाहताच मलायका अरोराही लाजेने गुलाबी झाली) मलायकाने आपल्या फोटोंमध्ये परिधान केलेली फॉरेस्ट ग्रीन रंगाची साडी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केली आहे. त्यामुळे ती खास असणं साहजिक आहे. या साडीची किंमत तब्बल १ लाख ३५ हजार असल्याचं म्हटलं जात आहे. या साडीच्या किमतीमध्ये आपण एखादी बाईक खरेदी करू शकतो. या साडीमध्ये मलायका अरोराचं सौंदर्य अजूनचं जास्त खुलून दिसत आहे. सध्या तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहेत. सध्या मलायका छोट्या पडद्यावरील डान्स शोमध्य परीक्षकाच्या भूमिकेत दिसून येत आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: