मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shahrukh Khan करणार मोठा धमाका! अभिनेता पुन्हा दिसणार डबल रोलमध्ये

Shahrukh Khan करणार मोठा धमाका! अभिनेता पुन्हा दिसणार डबल रोलमध्ये

२०१८ पासून शाहरुख खानचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाहीय. त्यामुळे चाहते निराश झाले आहेत. मोठ्या उत्सुकतेने शाहरुखच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहात आहेत.

२०१८ पासून शाहरुख खानचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाहीय. त्यामुळे चाहते निराश झाले आहेत. मोठ्या उत्सुकतेने शाहरुखच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहात आहेत.

२०१८ पासून शाहरुख खानचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाहीय. त्यामुळे चाहते निराश झाले आहेत. मोठ्या उत्सुकतेने शाहरुखच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहात आहेत.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 1 ऑक्टोबर-  बॉलिवूड (Bollywood) किंग अशी अभिनेता शाहरुख खानची(Shahrukh Khan) ओळख आहे. चाहते शाहरुखच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतात. शाहरुखही प्रत्येक दिवाळीला आपला चित्रपट रिलीज करून चाहत्यांना मेजवानी देत असतो. मात्र २०१८ पासून शाहरुख खानचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाहीय. त्यामुळे चाहते निराश झाले आहेत. मोठ्या उत्सुकतेने शाहरुखच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहात आहेत. मात्र सर्व चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. पुढच्या वर्षी शाहरुख खान बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करणार असल्याचं समजतंय. चाहत्यांना शाहरुखचे २ चित्रपटसुद्धा पाहायला मिळू शकतात. सिद्धार्थ आनंदचा 'पठाण' (Pathan) तसेच अभिनेता एटलीचासुद्धा (Atlee) चित्रपट करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

एटलीच्या चित्रपटात शाहरुख खान साऊथ स्टार प्रियामनी आणि नयनतारासोबत झळकणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार, शाहरुख खान एटलीच्या चित्रपटात डबल रोल निभावताना दिसणार आहे. म्हणजेच चित्रपटात एक नव्हे २ शाहरुख पाहायला मिळणार आहेत. तसेच चित्रपटाचं कथानक भारतीय पद्धतीच्या 'मनी हिस्ट'वर तयार करण्यात आला आहे. यामध्ये शाहरुख खान एका मुलींच्या गॅंगचं नेतृत्व करताना दिसून येईल. तसेच चित्रपटात शाहरुख एक मुलगा आणि वडील या दुहेरी भूमिकेत दिसेल. अर्थातच तरुण शाहरुखसोबत एक वयस्कर शाहरुख पाहायला मिळणार आहे.

(हे वाचा:JUST IN: 'गंगूबाई काठियावाडी'ची रिलीज डेट Out; नववर्षात आलिया भट्टचा धमाका)

चाहत्यांना शाहरुख खानच्या चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने प्रतीक्षा लागून राहिली आहे. आज या बातमीने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग मुंबईमध्ये सुरु आहे. यापूर्वी चित्रपटाचं शूटिंग पुण्यामध्ये सुरु होतं. चित्रपटासंबंधी सर्व गोष्टी गुप्त ठेवल्या जात आहेत. शेवटचं शाहरुख खानला 'जिरो' या चित्रपटात पाहण्यात आलं होतं. या चित्रपटात शाहरुखने एक अनोखी भूमिका साकारली होती. तसेच या चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ या दोघी होत्या. तगडी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकदम फ्लॉप ठरला होता.

(हे वाचा:Freddy: कार्तिक आर्यनने चित्रपटाचं शूटिंग केलं पूर्ण; सेटवरील PHOTO शेअर करत....)

तसेच काही दिवसांपूर्वी शाहरुख खानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यामध्ये शाहरुख खान अजूनही डिजिटल मीडियावर नाही. बाकी सर्व अभिनेते डिजिटल मीडियावर दिसून येत आहेत, मात्र शाहरुख सोडून. तसेच शाहरुख याबद्दल चिंतेत आलेलंही या व्हिडीओमध्ये पाहण्यात आलं होतं. मात्र हि फक्त हॉटस्टारची एक जाहिरात होती. मात्र यावरूनच शाहरुख खान लवकरच डिजिटलवर एन्ट्री करणार असल्याचा अंदाज सर्वांनां आला आहे. याला अधिक खात्रीशीर सलमान खानच्या इन्स्टा पोस्टने बनवलं होतं. त्यामध्ये त्याने शाहरुख खानचं स्वागत नाही करणार का? असा प्रश्न केला होता.

First published:

Tags: Entertainment, Shahrukh khan