जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Malaika Arora: 'आम्ही सध्या प्री-हनिमून….' अर्जुन कपूरसोबत लग्नाबद्दल विचारताच हे काय म्हणाली मलायका

Malaika Arora: 'आम्ही सध्या प्री-हनिमून….' अर्जुन कपूरसोबत लग्नाबद्दल विचारताच हे काय म्हणाली मलायका

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा

मलायका-अर्जुन नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल चर्चेत असतात. या दोघांना लग्नबंधनात अडकलेलं पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. दरम्यान आता या दोघांच्या लग्नावर मलायकानं अखेर मौन सोडलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 मार्च :  बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल्सपैकी एक अशी अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या जोडीची ओळख आहे. या जोडीवर नेहमीच सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात. मलायका-अर्जुन नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल चर्चेत असतात. यासोबतच दोघांच्या साखरपुडा आणि लग्नाच्या बातम्या नेहमीच व्हायरल होत असतात. या दोघांना लग्नबंधनात अडकलेलं पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. दरम्यान आता या दोघांच्या लग्नावर मलायकानं अखेर मौन सोडलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या कामासह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका स्वतःहून लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करत आहे. मलायकाच्या अरबाज खानसोबत घटस्फोट होण्यामागे लोक अर्जुन कपूरलाही कारण मानतात. अभिनेत्रीने या प्रकरणावर अनेकदा आपले स्पष्टीकरण दिले आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिच्या आणि अरबाजमध्ये पूर्वीसारखं प्रेम राहिलं नव्हतं म्हणून त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ऑस्करमध्ये फ्री नव्हती एंट्री; RRR च्या टीमला काढावं लागलं इतक्या लाखांचं एक तिकीट! मलायका आणि अरबाज यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. मात्र, घटस्फोटानंतरही हे जोडपे त्यांचा मुलगा अरहानच्या निमित्तानं एकमेकांना भेटतात आणि पार्टीही करतात. त्याच वेळी, घटस्फोटानंतर दोन वर्षांनी मलायका आणि अर्जुनने त्यांचे नाते सार्वजनिक केले. अलीकडेच, मीडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, मलाइकाला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच प्रश्न विचारण्यात आले.bयादरम्यान मलायकाला अर्जुनबद्दल विचारण्यात आले की, आपल्यापेक्षा लहान व्यक्तीला डेट करण्याचा अनुभव काय आहे? यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली, मला वाटते की हे आश्चर्यकारक आहे. जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा मला सांगण्यात आले की हा टॅग नेहमीच त्याच्यासोबत असेल. घटस्फोटानंतर प्रेम शोधणे ही वेगळी बाब आहे.'

जाहिरात

मलायका आपला मुद्दा पूर्ण करत पुढे म्हणाली, मला एवढेच सांगायचे आहे की प्रेमाला वय नसते. आपण प्रेम केल्यास, आपण प्रेम. लहान माणूस असो की मोठा माणूस, आपण कुठे आहोत हे ते ठरवू शकत नाही. मला समजून घेणारा जोडीदार मला मिळाला याबद्दल मी कृतज्ञ आहे. आमच्या नात्यात तो तरुण असल्याने मीही त्याच्यासारखीच तरुण राहते.’ अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

यावेळी तिला दोघांच्या लग्नाबद्दल देखील विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, ‘लग्न म्हणजे सर्व काही आहे का? लग्न ही दोन व्यक्तींमध्ये चर्चा करून ठरवण्यात येणारी गोष्ट आहे. जर आपल्याला त्यात झोकून द्यायचे असेल तर आपण त्याबद्दल विचार करू, निर्णय घेऊ आणि आम्ही त्याबद्दल बोलू. सध्या आम्ही आमच्या जीवनावर प्रेम करत आहोत. आम्ही आमच्या प्री-हनिमूनच्या टप्प्याचा आनंद घेत आहोत.’ अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात