जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ऑस्करमध्ये फ्री नव्हती एंट्री; RRR च्या टीमला काढावं लागलं इतक्या लाखांचं एक तिकीट!

ऑस्करमध्ये फ्री नव्हती एंट्री; RRR च्या टीमला काढावं लागलं इतक्या लाखांचं एक तिकीट!

एस.एस.राजामौली

एस.एस.राजामौली

ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्यासाठी एस.एस.राजामौली रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यासहित उपस्थित होते. पण या सगळ्यांना ऑस्करमध्ये फ्री एंट्री नसून त्यांना प्रत्येकी मोठी रक्कम मोजावी लागली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 मार्च : भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष खास ठरलं. या वर्षाच्या सुरुवातीलाच कलाविश्वातील सर्वाधिक मानाच्या मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात भारताने यंदा दोन ऑस्कर पटकावले आहेत.  ‘द एलिफंट व्हिसपर्स’ या शॉर्ट फिल्मला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म’ या कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला तर  एस.एस.राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’  गाण्यानेही यंदा ऑस्कर पटकावला. या ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्यासाठी एस.एस.राजामौली रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यासहित उपस्थित होते. पण या सगळ्यांना ऑस्करमध्ये फ्री एंट्री नसून त्यांना प्रत्येकी मोठी रक्कम मोजावी लागली आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एस एस राजामौली आणि त्यांचे कुटुंबीय, याशिवाय ‘नाटू नाटू’चे गीतकार चंद्रा बोस, संगीतकार एम. एम. कीरावानी, साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर, त्याची पत्नी आणि राम चरण त्याच्या पत्नीसह उपस्थित होता. पण या सर्वांना ऑस्कर एंट्री मोफत नव्हती. ऑस्कर २०२३ मध्ये प्रत्येक सीट मिळवण्यासाठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राजामौली यांना लाखो रुपये मोजावे लागले आहेत. त्यांच्या प्रति व्यक्ती तिकीटाची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. Kartik Aryan: सिद्धार्थनंतर आता कार्तिक आर्यन लवकरच चढणार बोहल्यावर! सगळ्यांसमोर केली मोठी घोषणा ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या वृत्तानुसार, RRR चे ‘नातू नातू’ संगीतकार एमएम कीरावानी, गीतकार चंद्रबोस आणि त्यांच्या पत्नींना ऑस्कर 2023 मध्ये विनामूल्य प्रवेश मिळाला होता, परंतु दिग्दर्शक एसएस राजा मौली आणि इतरांना प्रवेशासाठी प्रचंड रक्कम मोजावी लागली. अकादमी अवॉर्ड्सच्या क्रू नुसार, फक्त पुरस्कारार्थी आणि त्याच्या पत्नीलाच फंक्शनसाठी मोफत पास मिळतात. बाकी इतर लोकांना सोहळा लाइव्ह पाहण्यासाठी तिकिटे काढावी लागतात. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, एसएस राजामौली यांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी स्वतःसाठी तसेच त्यांच्या टीममधील इतर सदस्यांसाठी तिकिटे खरेदी केली होती. ऑस्कर 2023 च्या तिकीटाची किंमत प्रति व्यक्ती 25,000 डॉलर म्हणजेच 20.6 लाख रुपये इतकी होती.

News18लोकमत
News18लोकमत

एसएस राजामौली यांनी पत्नी रमा राजामौली, मुलगा कार्तिकेय आणि सून यांच्यासाठी तिकीट काढले होते. यासोबतच चित्रपटाचे अभिनेते राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनीही त्यांच्या पत्नींसोबत सोहळ्यात सहभागी होत तिकीटाची रक्कम मोजली होती. या सगळ्यांच्या तिकिटाची एकूण किंमत पाहिली तर ती सुमारे 2 कोटी इतकी मोठी रक्कम आहे. दरम्यान कालच अभिनेता रामचरण पत्नीसह भारतात पोहचला आहे. त्याचं काल विमानतळावर भव्य स्वागत झालं. त्याच्या स्वागतासाठी चाहत्यांनी ढोल ताशा सहित विमानतळावर गर्दी केली होती तसेच त्याच्यावर फुलांचा वर्षावही करण्यात आला. रामचरणच्या चाहत्यांचं हे कृत्य पाहून सगळेच भारावून गेले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात