मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Malaika-Arjun: मलायका अरोराने अर्जुन कपूरच्या बहिणीला दिलं खास गिफ्ट; किंमत वाचून व्हाल थक्क

Malaika-Arjun: मलायका अरोराने अर्जुन कपूरच्या बहिणीला दिलं खास गिफ्ट; किंमत वाचून व्हाल थक्क

बॉलिवूडमधील लव्ह बर्ड्स अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सतत चर्चेत असतात. दोघेही सतत सोशल मीडियावर एकमेकांबाबत प्रेम व्यक्त करत असतात. अर्जुन आणि मलायका एकमेकांच्या कुटुंबाच्या फारच जवळ आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 16 सप्टेंबर-   बॉलिवूडमधील लव्ह बर्ड्स अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सतत चर्चेत असतात. दोघेही सतत सोशल मीडियावर एकमेकांबाबत प्रेम व्यक्त करत असतात. अर्जुन आणि मलायका एकमेकांच्या कुटुंबाच्या फारच जवळ आहेत. अर्जुन कपूर अनेकवेळा मलायकाचा लेक अरहानची काळजी घेताना दिसून आला आहे. तर दुसरीकडे मलायकासुद्धा अर्जुनची बहीण अंशुलाची काळजी घेताना दिसून येते. नुकतंच मलायकाने अंशुलाला एक खास सरप्राईज गिफ्ट दिलं आहे. अंशुलाने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत प्रेम व्यक्त केलं आहे.

अर्जुन कपूरची धाकटी बहीण अंशुला कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अंशुलाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली नसली तरी, ती सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. तिची एक खास फॅन फॉलोईंग आहे. अंशुआ सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अंशुला बऱ्याचवेळा आपली फिटनेस जर्नी आणि एक्सरसाइजचे फोटोही शेअर करत असते. त्यासोबतचे आपल्या फॅमिलीसोबतचे फोटोही शेअर करत असते. मात्र आज अंशुला एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

अर्जुन कपूरची लाडकी बहीण अंशुला कपूर होणारी वहिनी मलायका अरोराच्या फारच जवळ असल्याचं सतत दिसून आलं आहे. या दोघींच्यात छान बॉन्डिंग आहे. नुकतंच अंशुला कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने मलायका कडून मिळालेलं गिफ्ट शेअर केलं आहे. मलायकाने नणंद अंशुलासाठी सुंदर गिफ्ट पाठवलं आहे. या फोटोमध्ये अंशुलाने ब्लॅक कलरचा एक सुंदर डिस्ने प्रिंटचा जम्पर परिधान केला आहे. हा डिस्ने थीमचा जम्पर मलायकाने अंशुलाला गिफ्ट केला आहे.

(हे वाचा:मलायकाला डेट करण्यापूर्वी नणंद अर्पिताच्या प्रेमात होता अर्जुन कपूर; असा झाला ब्रेकअप )

यावरुन मलायका आणि अंशुलामध्ये सुंदर नातं असल्याचं स्पष्ट होतं. अंशुलाने स्टोरी शेअर करत मलायकाचे आभार मानले आहेत. तर ही पोस्ट रिपोस्ट करत, मलायकाने नंदेवर प्रेम व्यक्त केलं आहे. मलायकाने अर्जुन कपूरच्या बहिणीसाठी खरेदी केलेल्या या जम्परची किंमत 2490 इतकी आहे. एका फॅशन ब्रँडच्या साईटवर या जम्परची किंमत देण्यात आली आहे.सर्वसामान्य लोकांना परवडणारं हे गिफ्ट आहे.

First published:

Tags: Arjun kapoor, Bollywood News, Entertainment, Malaika arora