मराठी बातम्या /बातम्या /देश /

हृतिक, कतरिनाला घेऊन केलेल्या Zomato च्या जाहिरातीवर सोशल मीडियात टीकेचा भडीमार: अखेर कंपनीनं दिलं 'हे' उत्तर

हृतिक, कतरिनाला घेऊन केलेल्या Zomato च्या जाहिरातीवर सोशल मीडियात टीकेचा भडीमार: अखेर कंपनीनं दिलं 'हे' उत्तर

सोशल मीडियावर होत असलेल्या मोठ्या टीकेला उत्तर देण्यासाठी झोमॅटोने अखेर आपली बाजू मांडली आहे.

सोशल मीडियावर होत असलेल्या मोठ्या टीकेला उत्तर देण्यासाठी झोमॅटोने अखेर आपली बाजू मांडली आहे.

सोशल मीडियावर होत असलेल्या मोठ्या टीकेला उत्तर देण्यासाठी झोमॅटोने अखेर आपली बाजू मांडली आहे.

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट:  गेल्या काही वर्षांत ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी (Online Food Ordering & Delivery) ही संकल्पना देशातल्या शहरी भागांमध्ये चांगलीच रुजली असून, झोमॅटो (Zomato) ही फूड डिलिव्हरी क्षेत्रातली दिग्गज कंपनी बनली आहे. काही दिवसांपूर्वी ही कंपनी चर्चेत होती, ती तिच्या आयपीओमुळे. आता ती चर्चेत आहे नव्या जाहिरातींमुळे. अलीकडेच झोमॅटोच्या दोन नव्या जाहिराती टीव्हीवर दिसू लागल्या असून, त्यापैकी एका जाहिरातीत हृतिक रोशन (Hrithik Roshan), तर दुसऱ्या जाहिरातीत कतरिना कैफ (Katrina Kaif) आहे. त्या जाहिरातींचं कौतुक होत आहे; मात्र त्याच वेळी त्या जाहिरातींवर अनेक जण टीकाही करत आहेत. डिलिव्हरी बॉइजना कठीण परिस्थितीत आणि कमी मानधनावर काम करावं लागतंय आणि दुसरीकडे कंपनी मात्र मोठमोठ्या स्टार्ससाठी जाहिरातींवर भरपूर पैसे खर्च करत आहे, असा या टीकेचा सूर आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या मोठ्या टीकेला उत्तर देण्यासाठी झोमॅटोने अखेर आपली बाजू मांडली आहे. 'झोमॅटो'ने स्पष्टीकरणादाखल ट्विट केलं असून, त्या ट्विटच्या हवाल्याने 'झी न्यूज'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

डिलिव्हरी बॉइजसह (Delivery Boys) अन्य कर्मचाऱ्यांचं मानधन, तसंच त्यांना ज्या परिस्थितीत काम करावं लागतंय, त्याबद्दल गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर झोमॅटोची जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे त्या चर्चेला अधिक उधाण आलं. 'या जाहिरातीतून असं दिसतं, की डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह्जना दोन ऑर्डर्सच्या मधल्या काळात एका मिनिटाचीही फुरसत नसते, इतका कामाचा ताण त्यांच्यावर असतो; ते ऊन-पावसाच्या परिस्थितीतही काम करतात. तरीही त्यांना कामाच्या तुलनेत फारसं मानधन नसतं. तरीही कंपनी त्यात सुधारणा करण्यापेक्षा सेलेब्रिटी स्टार्सना (Celebrity Stars Advertisement) जाहिरातीत घेण्यासाठी प्रचंड पैसा खर्च करत आहे. मूळ मुद्द्यांवरून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी या जाहिराती करण्यात येत आहेत,' असे आक्षेप आणि टीका या जाहिरातींवर केल्या जात आहेत. त्यावर आपली बाजू मांडण्यासाठी झोमॅटोने ट्विट केलं आहे.

'युझर्स अशा प्रकारे आक्षेप घेत आहेत, टीका करत आहेत, याची आम्हाला कल्पना आहे,' असं झोमॅटोने ट्विटच्या सुरुवातीला म्हटलं आहे. 'मात्र प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे आम्ही या जाहिरातींमागचा आमचा दृष्टिकोन काय होता, हे सांगू इच्छितो,' असं झोमॅटोने लिहिलं आहे.

हे वाचा - डब्बू रत्नानीसाठी शेहनाज गिलचं सुपरहॉट PHOTOSHOOT

'सध्या सोशल मीडियावर या कर्मचाऱ्यांबद्दलची चर्चा सुरू आहे; मात्र आमच्या जाहिरातीची संकल्पना सहा महिन्यांपूर्वी मांडली गेली आणि दोन महिन्यांपूर्वी जाहिरातींचं शूटिंग झालं,' असं सांगून सध्याच्या चर्चेशी त्याचा संबंध नसल्याकडे कंपनीने लक्ष वेधलं आहे.

'आम्ही ही जाहिरात करताना काही उद्देश डोळ्यांसमोर ठेवले होते. डिलिव्हरी पार्टनर्सना हिरो (Delivery Partners) बनवणं, तसंच आमच्यासाठी प्रत्येक ग्राहकच स्टार आहे आणि तो हृतिक रोशन किंवा कतरिना कैफपेक्षा कमी नाही, असं आम्हाला दाखवायचं होतं. तसंच. या जाहिरातीत हृतिक आणि कतरिना डिलिव्हरी पार्टनरशी ज्या प्रकारे आदराने वागतात, तसं सर्वांनीच वागण्याची गरज आहे, याकडेही आम्हाला लक्ष वेधायचं होतं. काही मोजके ग्राहकच प्रत्यक्षात तसं वागतात. डिलिव्हरी पार्टनरच्या कामाला असलेली प्रतिष्ठा दर्शवणं आणि वाढवणं, तसंच आमचे डिलिव्हरी पार्टनर्स किती अभिमानाने आपलं काम करतात हे दर्शवणं, असे उद्देश या जाहिरातीमागे होते,' असं कंपनीने स्पष्ट केलं.

'आमची जाहिरात सद्हेतूने तयार केलेली असली, तरी दुर्दैवाने काही जणांकडून तिचा चुकीचा अर्थ लावला गेला. डिलिव्हरी पार्टनर्ससंदर्भातले मुद्दे योग्य रीतीने सोडवण्यासंदर्भात आमची चर्चा सुरू आहे,' असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: Advertisement, Hritik Roshan, Katrina kaif, Zomato