मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Imlie च्या चाहत्यांना मोठा धक्का; 'या' मुख्य कलाकाराची मालिकेतून एक्झिट

Imlie च्या चाहत्यांना मोठा धक्का; 'या' मुख्य कलाकाराची मालिकेतून एक्झिट

या मालिकेतील मुख्य कलाकाराने मालिकेला गूडबाय म्हटलं आहे.

या मालिकेतील मुख्य कलाकाराने मालिकेला गूडबाय म्हटलं आहे.

या मालिकेतील मुख्य कलाकाराने मालिकेला गूडबाय म्हटलं आहे.

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : तुमचा एखादा आवडता टीव्ही शो (Tv show) असतो, जो तुम्ही दररोज न चुकता पाहत असता. हा दररोज पाहण्यामागे तुमचं वेगवेगळं कारण असू शकतं. कदाचित तुम्हाला त्याची स्टोरी आवडत असेल किंवा तुम्ही आवडत्या कलाकारासाठी पाहत असाल. मात्र आवडता कलाकारच तो शो सोडून गेल्यास मात्र तुम्हाला फार दुःख होतं. तुम्ही सध्या 'इमली' (Imlie) हा टीव्ही शो पाहत असाल तर तुमच्यासाठी निराशाजनक बातमी आहे. कारण या शोमधून एका मुख्य कलाकाराने एक्झिट घेतली आहे.

छोट्या पडद्यावर 'इमली' ही सीरियल लोकप्रिय ठरली आहे. टीआरपीच्या (TRP) लिस्टमध्ये सुद्धा हा शो सातत्याने वरच्या क्रमांकावर राहिला आहे. पण आता या शोमध्ये एक मोठा बदल होणार आहे. मुख्य अभिनेता आदित्य कुमार त्रिपाठी (Aditya Kumar Tripathi) ही भूमिका साकारणाऱ्या गश्मीर महाजनीने (Gashmeer mahajani) या मालिकेला रामराम केला आहे. तो या मालिकेतून बाहेर पडत असल्याचा खुलासा स्वतः गश्मीरनेच केला आहे.

हे वाचा - टीव्हीची बोल्ड क्वीन निया शर्माची BB OTTमध्ये होणार तुफानी एन्ट्री

अलीकडेच, गश्मीर महाजनीने त्याच्या सोशल मीडिया (Social Media) अकाउंटवर काही इन्स्टा स्टोरीज (Insta Stories) पोस्ट केल्या आहेत. ज्यामध्ये त्यानं सांगितलं आहे की, तो आता हा शो सोडत आहे. शूटिंगच्या सेटवरवरूनच त्याने ही घोषणा केली आहे. शूटिंगच्या सेटवरच त्याने हा व्हिडीओ शूट केला आहे. या वेळी त्याच्यासोबत सहकलाकार सुद्धा आहेत. त्यामध्ये तो असं म्हणतो की, ‘आज या सेटवर माझा शेवटचा दिवस आहे, गेल्या 9 महिन्यांपासून आम्ही येथे सतत काम करत आहोत.’

यामध्ये गश्मीरने कुठंही शो सोडण्याचं नेमकं कारण काय? याचा उल्लेख केलेला नाही. कारण यावेळी या शोमध्ये त्याचा अभिनय सुद्धा अत्यंत चांगला होता. चाहत्यांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत होता. गश्मीर महाजनीने 'इमली'ला गुडबाय केल्यानंतर पुढे त्याचा काय प्लॅन आहे. त्याला नवीन कोणता मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे का? पुढे नक्की तो कोणत्या भूमिकेत दिसणार? या सर्वांची उत्तरे चाहत्यांना खरंतर त्याच्या संवादामधूनच मिळतील.

हे वाचा - लग्नाच्या अवघ्या 4 वर्षांतचं मोडणार समंथाचा संसार? जाणून घ्या सत्य

हा शो सध्या वेगळ्या वळणावर येऊन पोहचला आहे. या मालिकेच्या कथानकात सध्या अनेक प्रकारचे कट रचले जात आहेत. इमली आणि आदित्यच्या प्रेमावर मालिनीची अगोदरच वाकडी नजर होती. त्यातच आता त्यांच्यामध्ये सत्यकामची सुद्धा खलनायक (villain) म्हणून एंट्री झाली आहे. त्यामुळे पुढे काय होईल अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.

First published:

Tags: Entertainment