मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Fit राहण्यासाठी मलायकानं दिल्या खास Tips; तुम्ही देखील करु शकता ट्राय

Fit राहण्यासाठी मलायकानं दिल्या खास Tips; तुम्ही देखील करु शकता ट्राय

मलायकानं गेल्या काही काळात फीट अँड फाईन राहण्यासाठी तीन सुत्री कार्यक्रम तयार केला आहे. या टीप्स वापरुन तुम्ही देखील सुदृढ राहू शकता. (Malaika Arora fitness tips)

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 4 एप्रिल: मलायका अरोरा (Malaika Arora) ही बॉलिवूडधील सर्वाधिक ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. मात्र आपला मादकपणा टिकवण्यासाठी ती प्रचंड मेहनत करते. मलायकानं गेल्या काही काळात फीट अँड फाईन राहण्यासाठी तीन सुत्री कार्यक्रम तयार केला आहे. या टीप्स वापरुन तुम्ही देखील सुदृढ राहू शकता. (Malaika Arora fitness tips) तर मग पाहूया मलायकानं दिलेल्या या खास टीप्स...

मलायकानं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिनं एक पोस्ट लिहून तंदुरुस्त राहण्याचा मंत्र आपल्या चाहत्यांना दिला आहे. “मलायकाच्या या टीप्स फॉलो करा... दिवसाची सुरुवात आनंदानं करा, व्यायाम करा, स्वच्छ आणि सकस आहार घ्या या तीन गोष्टी फॉलो करा तुम्ही काय तंदुरुस्त रहाल. कुठल्याही क्षणी स्वत:ला कमी लेखू नका. व्यायाम आणि योग्य आहार हीच सुदृढ शरीराची गुरुकिल्ली आहे.” अशा आशयाची पोस्ट लिहून मलायकानं खास टीप्स चाहत्यांना दिल्या आहेत. तिची ही पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

अवश्य पाहा - PHOTO: गळ्यात मंगळसूत्र… भांगेत कुंकू… उर्वशी रौतेलानं गुपचूप केलं लग्न?

अवश्य पाहा - जसलीन झाली 31 वर्षांची; 67 वर्षांच्या गायकासोबत अफेअर करुन आली होती चर्चेत

यापूर्वी मलायका कोरोनामुळं चर्चेत होती. तिनं कोरोना लशीचा पहिला डोस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोद्वारे तिनं देशवासीयांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. कोरोनाचं संक्रमण वाढत आहे. त्यामुळं स्वत:ला, कुटुंबाला आणि आपल्या समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोना लस घ्या असं आवाहन तिनं या पोस्टद्वारे केलं होतं. त्यानंतर आता ती या फिटनेट टीप्समुळं चर्चेत आहे.

First published:

Tags: Bold photoshoot, Entertainment, Health Tips, Malaika arora, Marathi entertainment, Yoga