मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

एक कॉल आणि अकाउंटमधून पैसे गायब, KYC च्या नावाखाली अभिनेत्रीची फसवणूक

एक कॉल आणि अकाउंटमधून पैसे गायब, KYC च्या नावाखाली अभिनेत्रीची फसवणूक

ऑनलाइन ट्रान्झॅक्शन दरम्यान या अभिनेत्रीची मोठी फसवणूक झाली आहे.

ऑनलाइन ट्रान्झॅक्शन दरम्यान या अभिनेत्रीची मोठी फसवणूक झाली आहे.

ऑनलाइन ट्रान्झॅक्शन दरम्यान या अभिनेत्रीची मोठी फसवणूक झाली आहे.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 12 मार्च : इंटरनेट बँकिंग आणि ऑनलाइन ट्रान्झॅक्शननं लोकांचं जीवन खूप सुकर केलं असलं तरीही त्यामुळे लोकांच्या समस्याही तेवढ्याच वाढल्या आहेत. रोज सायबर क्राइमबद्दल काही ना काही ऐकायला मिळतं. पण आता एक अभिनेत्री या सायबर क्राइमची शिकार झाली आहे. ऑनलाइन ट्रान्झॅक्शन दरम्यान या अभिनेत्रीची फसवणूक झाली आहे. बँक फ्रॉडमध्ये 'नागिन 3'ची अभिनेत्री मृणाल देशराजच्या अकाउंटमधून तब्बल 27 हजार रुपयांची रक्कम काढण्यात आली.

ऑनलाइन ट्रान्झॅक्शन दरम्यान अभिनेत्री मृणाल देशराजच्या अकाउंटमधून एवढी मोठी रक्कम काढली गेली. याबद्दल बोलताना अभिनेत्रीनं, ही माझ्या मेहनतीची कमाई होती जी हातातून अशाप्रकारे गेली आणि आता माझी फसवणूक झाल्यासारखं वाटत आहे. याबाबत स्पॉटबॉय-ईसोबत बोलताना मृणाल म्हणाली, ही घटना फेब्रुवारी 25 ला घडली. माझ्या पेटीएममध्ये काहीतरी गडबड झाली होती आणि पेमेंट करता येत नव्हता. जेव्हाही मी ट्रान्झॅक्शन करण्याचा प्रयत्न करत असे त्यावेळी मला केव्हायसी (KYC)चा मसेज येत असे. मी सर्व पेमेंट करण्यासाठी शक्यतो पेटीएम वापरत असे त्यामुळे मी पेटीएम सपोर्टला मेसेज केला की मला कोणाही KYC प्रोसेससाठी फोन केलेला नाही आणि माझी 2500ची रक्कम ब्लॉक करण्यात आली आहे. ज्याचा मी वापर करु शकत नाही.

OMG! सलमान खाननं अवघ्या 20 मिनिटांसाठी खर्च केले तब्बल 7 कोटी

मृणाल पुढे म्हणाली, माझ्या मेसेजनंतर मला पेटीएमकडून एक कॉल आला आणि त्यांनी मला पेटीएममध्ये KYC करण्यास सांगितलं. त्यासाठी त्यांनी मला एक लिंक पाठवली. मी त्या लिंकवर क्लिक केलं आणि माझ्या वॉलेटमधून 758 रुपये कमी झाले. मी त्या नंबरवर पुन्हा कॉल केला आणि त्यांनी मला पुन्हा एक लिंक पाठवत तुमच्या अकाउंटमधून गेलेले पैसे पुन्हा मिळतील असं सांगितलं पण त्यानंतर काही वेळात माझ्या अकाउंटमधून 27 हजार रुपये काढले गेले.

आणखी एका सेलिब्रेटी कपलचा काडीमोड, 4 वर्षांपूर्वी केलं होतं कोर्ट मॅरेज

मृणाल म्हणाली, मी जामताडा वेब सीरिज पाहिली होती. त्यामुळे मी अशा कॉलपासून नेहमीच सावध राहते. मात्र हैरण करणारी गोष्ट ही होती की, मी पेटीएम सपोर्टवर मेसेज करत असताना मला हा कॉल आला आणि विशेष म्हणजे याचं ट्रु-कॉलरवर नाव सुद्धा पेटीएमच्या नावानं दाखवलं जात होतं. त्यामुळे मला त्यांच्यावर अजिबात संशय आला नाही.

या प्रकारानंतर मृणालनं बँकेत याबाबत तक्रार केली. तसेच पोलीस स्टेशनमध्येही याबाबत FIR दाखल केली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणासाठी बँक आणि पोलिसांनी मलाच जबाबदार ठरवलं आहे. त्यांच्या मते मी त्या लिंकवर क्लिक करायला नको होतं. हे सर्व सांगण्यामागे हे प्रकरण सर्वांसमोर यावं आणि दुसरं कोणी असं फसू नये एवढाच होता असंही मृणालनं स्पष्ट केलं.

मुग्धा-राहुलच नाहीतर 'या' बॉलिवूड कपलच्या वयातही आहे मोठा फरक

First published:

Tags: Bollywood