मुंबई, 12 मार्च : मणिकर्णिका या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेनं आता या ठिकाणी आपलं स्थान पक्कं केलं आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘बागी 3’ या सिनेमात अंकितानं रुची नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. ज्याचं खूप कौतुक झालं. मात्र आता पुन्हा एकदा अंकिता तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अंकितानं तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ‘बागी 3’च्या यशानंतर अंकिता खूप खूश आहे. नुकतेच तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर होळी सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच्या काही मित्रांसोबत तिचा बॉयफ्रेंड विकी जैन सुद्धा दिसत आहे. या फोटोंमध्ये एकीकडे अंकिता फ्रेंड्ससोबत धम्माल मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहे तर दुसरीकडे विकीसोबत मात्र तिचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. यातील एका फोटोमध्ये विकी आणि अंकिता एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहताना दिसत आहेत. हॉलीवूडमध्ये पोहोचला कोरोना, बडा अभिनेता आणि त्यांच्या बायकोची टेस्ट पॉझिटिव्ह
अंकिता लोखंडेचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहेत. तिला बॉयफ्रेंडसोबत असं खूश पाहून तिचे चाहते सुद्धा खूश आहेत. अनेकांनी या फोटोंवर कमेंट करत या कपलला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी मात्र हे फोटो पाहिल्यावर तिला पवित्र रिश्तामधील तिचा को-स्टार आणि एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूत आणि विकीची तुलना केली आहे. सुशांत आणि अंकिता जवळपास 10 वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र आता हे दोघंही वेगळे झाले असून सध्या सुशांत रिया चक्रवर्तीला डेट करत आहे. OMG! सलमान खाननं अवघ्या 20 मिनिटांसाठी खर्च केले तब्बल 7 कोटी आणखी एका सेलिब्रेटी कपलचा काडीमोड, 4 वर्षांपूर्वी केलं होतं कोर्ट मॅरेज