जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मलायकाला डेट करण्यापूर्वी नणंद अर्पिताच्या प्रेमात होता अर्जुन कपूर; असा झाला ब्रेकअप

मलायकाला डेट करण्यापूर्वी नणंद अर्पिताच्या प्रेमात होता अर्जुन कपूर; असा झाला ब्रेकअप

मलायकाला डेट करण्यापूर्वी नणंद अर्पिताच्या प्रेमात होता अर्जुन कपूर; असा झाला ब्रेकअप

मलायकासोबत नात्यात येण्याआधी अर्जुन कपूरने बॉलिवूड भाईजान सलमान खानच्या बहिणीला डेट केलं आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 सप्टेंबर-  बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल्सपैकी एक म्हणून अर्जुन कपूर आणि मलायका अरोराला ओळखलं जातं. या दोघांनी सुरुवातीला आपलं नातं लपवलं असलं, तरी आता त्यांनी आपलं नातं ऑफिशियल केलं आहे. ते सतत एकत्र सुट्टीचा आनंद घेताना दिसून येतात. परंतु मलायकासोबत नात्यात येण्याआधी अर्जुन कपूरने बॉलिवूड भाईजान सलमान खानच्या बहिणीला डेट केलं आहे. वाटलं ना आश्चर्य? हे खरं आहे. अर्जुन कपूर एकेकाळी अर्पिता खानसोबत रिलेशनशिपमध्ये होता. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता अर्जुन कपूरने अभिनेता सलमान खानच्या बहिणीला डेट केलं आहे. अर्जुन कपूर आणि अर्पिता खान रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांमध्ये फार छान बॉन्डिंग होतं. तब्बल दोन वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते. परंतु नंतर अचानक या दोघांचा ब्रेकअप झाला होता. असं म्हटलं जातं की, मलायका अरोरासोबत अर्जुन कपूरची जवळीकता वाढत होती, त्यामुळे खान कुटुंबाने अर्जुनला तिच्यापासून दूर राहण्याचा इशाराही दिला होता. परंतु अर्जुनने ते फारसं मनावर घेतलं नव्हतं. दरम्यान अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या नात्यातसुद्धा अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही दिवसांनंतर मलायका आणि अरबाज खानचा घटस्फोटदेखील झाला. त्यानंतर मलायका आणि अर्जुनने एकेमकांना डेट करायला सुरुवात केली होती. या दोघांमध्ये वयाचं मोठं अंतर आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना बऱ्याचवेळा ट्रोलदेखील केलं जातं. परंतु या दोघांना त्याचा अजिबात फरक पडत नाही. मलायका आणि अर्जुन सतत सोशल मीडियावरुन आपलं प्रेम व्यक्त करत असतात.

News18

**(हे वाचा:** कतरिना-विकी झळकणार एकत्र! पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार सेलिब्रेटी कपल ) सध्या अर्पिता खानने अभिनेता आयुष शर्मासोबत लग्न केलं आहे. या दोघांना दोन मुलेसुद्धा आहेत. तर मलायका अरोराने 1998  मध्ये अरबाज खानसोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या 19 वर्षानंतर म्हणजेच 2017 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेत सर्वांनाच धक्का दिला होता. त्यानंतर आता मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर अरबाज खान विदेशी मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात