‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला कॉपी केल्यानं मलायका अरोरा होतेय ट्रोल

‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला कॉपी केल्यानं मलायका अरोरा होतेय ट्रोल

नुकताच सोनम कपूरच्या बर्थ डे पार्टीतील मलायका अरोराचा लुक चर्चेचा विषय ठरला होता.

  • Share this:

मुंबई, 11 जून : अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. वयाच्या 45 व्या वर्षीही मलायकाचा फिटनेस तरुण मुलींना लाजवेल असा आहे. सध्या ही अभिनेत्री अर्जुन कपूरशी असलेल्या अफेअरमुळे चर्चेत आहे. नुकतीच तिनं अर्जुनसोबत अभिनेत्री सोनम कपूरच्या बर्थ डे पार्टीमध्ये हजेरी लावली. यावेळी ती तिच्या व्हाइट कलरच्या साडीतील फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली होती. पण आता याच साडीमुळे मलायकाला ट्रोल केलं जात आहे. बॉलिवूड मधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणला कॉपी केल्यानं सोशल मीडियावर मलायकाची खिल्ली उडवली जात आहे.

VIRAL VIDEO : बँकॉकच्या गल्लीत कपडे विकताना दिसली ‘भारत’ची ही अभिनेत्री

नुकतीच सोनम कपूरनं तिच्या बर्थडेच्या निमित्तानं सर्वांना ग्रँड पार्टी दिली यावेळी या पार्टीसाठी अर्जुनसोबत मलायकानंही हजेरी लावली होती. या पार्टीसाठी मलायकानं व्हाइट कलरची फ्लॉरल डिझाइन असलेली साडी परिधान केली होती. ही साडी काही दिवसांपूर्वी दीपिकानं तिच्या नातेवाईकांच्या लग्नात घातलेल्या साडीसारखी होती. मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सनी तिला दीपिकाची कॉपी केल्याचं म्हणत ट्रोल करायला सुरुवात केली.

VIDEO : कॅन्सर फ्री झाल्यावर अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता घेतेय ‘ही’ थेरपी

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणनं तिच्या चुलत बहिणीच्या लग्नात फ्लॉरल प्रिंटची व्हाइट साडी परिधान केली होती. तिच्या या लुकचं चाहत्यांनी खूप कौतुक केलं होतं. त्यामुळे सर्वांना तिची ही साडी आजही लक्षात आहे. खरं तर मलायका आणि दीपिकाच्या साडीच्या ब्लाऊजची स्टाइल खूप वेगळी आहे. ही साडी प्रसिद्ध सेलिब्रिटी डिझायनर रोहित बालनं डिझाइन केली आहे. दीपिका आणि मलायका दोघींनीही ही साडी खूप छान कॅरी केली आहे आणि दोघीही यामध्ये खूपच सुंदर दिसत होत्या.

अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाउंट हॅक, बायोमध्ये लिहिलं 'लव्ह पाकिस्तान'

First published: June 11, 2019, 11:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading