VIDEO : कॅन्सर फ्री झाल्यावर अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता घेतेय ‘ही’ थेरपी

VIDEO : कॅन्सर फ्री झाल्यावर अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता घेतेय ‘ही’ थेरपी

हा व्हिडिओ शेअर करताना सोनालीनं चाहत्यांना एक सुचना सुद्धा केली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जून : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सरचं निदान झाल्यानंतर ट्रीटमेंट घेण्यासाठी ती अमेरिकेला गेली होती. जवळपास वर्षभर ट्रीटमेंट घेऊन कॅन्सर फ्री झाल्यावर काही महिन्यांपूर्वीच ती भारतात परतली आहे. पण या ट्रीटमेंट दरम्यान तिला अनेक चढ-उतारांना सामोरं जावं लागलं. पण तरीही ती नेहमीच सकारात्मक राहिली आणि आपला अनुभव सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी शेअर करत राहीली. सध्या सोनाली मुंबईमध्ये आपल्या कुटुंबीयांशी वेळ घालवत असून ती आता आणखी एक ट्रीटमेंट घेत असल्याचं तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमधून समोर आलं आहे.

VIRAL VIDEO : बँकॉकच्या गल्लीत कपडे विकताना दिसली ‘भारत’ची ही अभिनेत्री

सोनालीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती aqua therapy घेताना दिसत आहे. सोनाली पाण्यामध्ये व्यायाम करत आहे. सोनाली सांगते, सामान्य परिस्थित असा व्यायाम करण सोपं आहे. पण पाण्याच्या आत राहून असा व्यायाम करणं खूप कठीण असतं. हा व्हिडिओ शेअर करताना सोनालीनं सर्वांना एक सुचना केली आहे. तिनं लिहिलं, ‘सूचना: हे जेवढं पाहताना सोपं वाटत आहे. तेवढं सोपं ते अजिबात नाही. माझ्या नव्या aqua therapy चं ट्रेनिंग सेशन खूप कठीण आहे. पण हेच जर मी पाण्याच्या बाहेर करेन तर खूप सोपं आहे. पण यातून मला समाधान मिळवं असा माझा सामान्य प्रयत्न आहे आणि मला यापासून लांब पळण्याचा कोणतंही कारण शोधायचं नाही.’

अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाउंट हॅक, बायोमध्ये लिहिलं 'लव्ह पाकिस्तान'

सोनालीला कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये कीमोथेरपी च्या वेळी सर्व केस काढून टाकावे लागले होते. बाल्ड झाल्यानंतर आता सोनालीच्या डोक्यावर पुन्हा नव्याने केस यायल सुरुवात झाली आहे. याचा अनुभव शेअर करताना सोनाली म्हणाली, ‘जेव्हा मी पहिल्यांदा हेअरकट केला तेव्हा मला अजिबात दुःख झालं नाही. त्यावेळी केसांपेक्षा आपलं जिवंत असणं महत्वाचं आहे याची मला जाणीव झाली. अशा प्रकारे माझ्या विचारांमध्ये बदल होत गेला. मला आतापर्यंत माझ्या केसांमुळे खूप कंटाळवाणं वाटत असे. माझे केस लांबसडक होते. त्यामुळे तुमचे केस जेव्हा लांबसडक असतात तेव्हा तुम्हाला ते कापायची खूप भीती वाटत राहते.’

हेजलच्या आधी या अभिनेत्रींसोबत रंगली युवराजच्या प्रेमाची चर्चा!

First published: June 11, 2019, 10:35 AM IST

ताज्या बातम्या