अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाउंट हॅक, बायोमध्ये लिहिलं 'लव्ह पाकिस्तान'

अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाउंट हॅक, बायोमध्ये लिहिलं 'लव्ह पाकिस्तान'

यामागे पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या हॅकरचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 11जून : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाउंट हॅक करून हॅकर्सनी त्याच्या ट्विटर हँडलच्या प्रोफाइलवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावला होता. याशिवाय अमिताभ यांचा बायो बदलून त्या ठिकाणी ‘लव्ह पाकिस्तान’ असं लिहिण्यात आलं होतं. हा प्रकार सोमवारी घडला. मात्र हे अकाउंट कोणी हॅक केलं याचा शोध अद्याप लागलेला नाही. पण यामागे पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या हॅकरचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. ते नेहमीच त्यांच्या ट्विटर वरून त्यांचे विचार लोकांशी शेअर करत असतात. तसेच ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ते नेहमीच त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. आता त्यांचं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची बातमी सोशल मीडियावर वेगानं पसरली आहे. यामुळे नेटक-यांनी ट्रोलींग सुरू केले. इम्रान खानचा फोटो आता तिथे नाहीए तसेच बायो सुद्धा बदलण्यात आला आहे. मात्र अमिताभ बच्चन यांचं ट्विटर पूर्ववत सुरु झालेलं दिसत नाही. कारण अमिताभ यांच्या कडून अद्याप कोणतंही ट्विट करण्यात आलेलं नाही.

BHARAT ची 'ही' अभिनेत्री दिसली आदित्य ठाकरेंबरोबर


काही दिवसांपूर्वीच अमिताभ यांच्या सेक्रेटरी शीतल जैन यांचं निधन झालं. अमिताभ यांच्या सिने करिअरच्या यशात शीतल यांचं खूप मोठं योगदान होतं. ज्यावेळी अमिताभ यांनी बॉलिवूड करिअरला सुरुवात केली तेव्हापासून त्या अमिताभ यांच्या सोबत होत्या. शीतल यांच्या निधनानंतर अमिताभ यांनी त्याच्या अधिकृत ब्लॉगवर शीतल यांच्यासाठी एक संदेशही लिहिला होता.

Yuvraj Singh- निवृत्तीनंतर युवराज- हेजलचा हा व्हिडिओ होतोय VIRAL

अमिताभ बच्चन ट्विटरवरून वेळोवेळी त्यांच्या कविता सुद्धा त्यांच्या चाहत्यांशी शेअर करतात. ते बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. लवकरच अमिताभ बच्चन ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीनं केलं असून यात आलिया भट अणि रणबीर कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय अमिताभ एका दाक्षिणात्य सिनेमातही दिसणार आहेत.

वडिलांच्या आठवणीत भावुक झाली प्रियांका, सासरे म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 08:43 AM IST

ताज्या बातम्या