जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Coronavirus Outbreak दरम्यान मलायका कुटुंबासाठी करतेय खास काम, Video शेअर करून म्हणाली...

Coronavirus Outbreak दरम्यान मलायका कुटुंबासाठी करतेय खास काम, Video शेअर करून म्हणाली...

Coronavirus Outbreak दरम्यान मलायका कुटुंबासाठी करतेय खास काम, Video शेअर करून म्हणाली...

मलाकानं तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 मार्च : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसनं सर्वांनाच घरात कोंडून घेण्यास भाग पाडलं आहे. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्येही लॉकडाऊनची परिस्थिती आली आहे. ज्यामुळे सर्वच कलाकारांनी सिनेमांची शूटिंग थांबवून घरी बसणंच पसंत केलं आहे. अशात घरी असलेल्या मलाकानं तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे. एरवी नेहमीच जिमला किंवा योगा क्लासला जाताना दिसणारी मलायका सध्या मात्र घरीच बसून आहे. पण घरी असतानाही ती स्वतःचे छंद जोपासताना दिसत आहे. नेहमीच्या बीझी शेड्युलमुळे अनेक गोष्टी करायच्या राहून जातात ज्या आता करता येऊ शकतात. मलायकानं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती किचनमध्ये जेवण बनवताना दिसत आहे. जेवण बनवणं आपल्याला खूप आवडतं असं या व्हिडीओमध्ये मलायकानं सांगितलं आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘I Love Cooking’ अमेरिकेतून परतल्यावर अनुपम खेर यांनी केलं असं काही की आई झाली नाराज

जाहिरात

फिटनेस फ्रिक असलेली मलायका नेहमीच तिच्या जेवणाचीही तेवढीच काळजी घेताना दिसते. पण आता देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे आणि घराबाहेर पडणं शक्य नाही तेव्हा मलायका तिचा पूर्ण वेळ तिच्या कुटुंबीयांसाठी देताना दिसत आहे आणि सर्वांचं जेवण ती स्वतःच तयार करताना दिसत आहे. मलायकानं जेवण बनवताना जो व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तिनं मलबारी वेज बनवत असल्याचं सांगितलं आहे. ट्रेनमधून प्रवास करत होती रवीना टंडन, Coronavirus च्या भीतीनं साफ केली पूर्ण सीट

जाहिरात

मलायकानं हा व्हिडीओ पोस्ट करताना एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ज्यात तिनं तिच्या जेवण बनवण्याच्या छंदाबद्दल सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये ती नो मेकअप लुकमध्ये दिसत आहे. तिनं डेनिम स्कर्ट आणि व्हाइट टी-शर्ट घातला आहे. तिचा हा नॉर्मल लुक चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरताना दिसत आहे. वयाच्या 17 व्या वर्षी लग्न ते सिंगल मदर, असं आहे कनिका कपूरचं पर्सनल लाइफ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात