मुंबई, 21 मार्च : कोराना व्हायरसमुळे (Corona Virus) सध्या सगाळीकडे प्रचंड भीतीचं वातावरण आहे. भारतातल्या सर्व सेलिब्रेटींनी त्यांचं शूटिंग थांबवलं आहे. तर विदेशात असलेले सेलिब्रेटी देशात परतत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनम कपूर भारतात परत आली त्यानंतर आता अभिनेता अनुपम खेर सुद्धा अमेरिकेतून परत आले आहेत. पण अमेरिकेतून परत आल्यावर त्यांनी लगेचच होम क्वारंटाईन केलं आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनाही भेटता आलं नाही. पण त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत सर्वांना घरी राहून स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ते व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसत आहेत. ते त्यांच्या भावासोबत बोलत आहेत आणि सांगत आहेत की अशा परिस्थितीत घरी येणं शक्य नाही कारण ते सुरक्षित नाही. त्यानंतर ते भावाला आईशी बोलणं करून द्यायला सांगतात. त्यांची आई त्यांना घरी यायला सांगते. पण ते तिला समजावतात की सध्या एकमेकांना भेटणं सेफ नाही यासोबतच ते तिला स्वतःची काळजी घ्यायला सांगतात.
वयाच्या 17 व्या वर्षी लग्न ते सिंगल मदर, असं आहे कनिका कपूरचं पर्सनल लाइफ
As a precaution I decided not to visit Mom. So facetimed her instead. Initially she got angry but soon understood the importance of social distance. In this case mother-son distance. Both of us felt bad. पर क्या करे ? आजकल के माहौल में ये जरूरी है! #DulariiRocks...Always. pic.twitter.com/pCeTCJ9r1W
— Anupam Kher (@AnupamPKher) March 20, 2020
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मी ठरवलं आहे की आईला भेटायला जाणार नाही. त्यामुळे मी तिच्याशी व्हिडीओ कॉलवर बोललो. सुरुवातीला ती नाराज झाली मात्र नंतर तिला माझं म्हणणं पटलं. मलाही वाईट वाटलं पण काय करणार आजकाल जे वातावरण आहे त्यात याची खूप आवश्यकता आहे. #DulariiRocks…’
Coronavirus मुळे शूटिंग बंद, भाईजान करतोय बागेत काम; पाहा VIDEO
कोरोना व्हायरसमुळे लोकांचं प्रचंड नुकसान होत आहे. आतापर्यंत भारतात 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. बॉलिवूडमधील अनेक सिनेमाचं स्क्रिनिंग थांबवण्यात आलं असून सर्व सेलिब्रेटी सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. दरम्यान गायिका कनिका कपूरची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली असल्यानं सेलिब्रेटींमध्ये भीतीचं वातावरण आहे.
अनिल कपूर लवकरच होणार आजोबा? सोनमच्या त्या फोटोंमुळे होत आहे Pregnancy ची चर्चा